Adar Poonawala : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 07:51 AM2021-12-15T07:51:32+5:302021-12-15T07:52:52+5:30

Adar Poonawala : कोरोनावरील कोविशिल्ड लस बनविणारी पहिली भारतीय कंपनी म्हणून पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटने जगभर वाहवा मिळवली. भारतासह विदेशातही त्यांनी कोविशिल्ड लसीची पूर्तता केली

Adar Poonawala : India's billionaire Poonawalla family pledges $66 mln to Oxford University | Adar Poonawala : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर

Adar Poonawala : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर

Next
ठळक मुद्देऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या AstraZeneca (AZN.L) आणि सीरम इंस्टीट्यूटच्या माध्यमातून कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी ब्रिटीश तोडीचे कोविड 19 च्या डोसचे वर्जन बनविण्याचा प्रयत्न असणार आहे

नवी दिल्ली - कोरोना या महामारीत कोरोनावरील लसीचे संशोधन आणि उत्पादन केल्यामुळे जगभर चर्चेत असलेल्या सीरम इंस्टीट्यूटच्या पुनावाला यांना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुनावाला कुटुंबीयांकडून जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला तब्बल 66.2 दशलक्ष डॉलरची देणगी देण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात AstraZeneca-Oxford COVID-19 संसोधन लॅब आणि कॅम्पस उभारण्यासाठी सीरम इंस्टीट्यूटकडून हा निधी देण्यात येत आहे.  

कोरोनावरील कोविशिल्ड लस बनविणारी पहिली भारतीय कंपनी म्हणून पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटने जगभर वाहवा मिळवली. भारतासह विदेशातही त्यांनी कोविशिल्ड लसीची पूर्तता केली. देशात लसीकरण झाल्याने कोरोना व्हायरसला आळा घालण्यात मोठं यश मिळालं. त्यामुळेच, आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कोविडवरील रिसर्च इंस्टीट्यूट उभारण्यात येत आहे. त्यासाठी, सीरम लाईफ सायन्स युनीटच्या माध्यमातून 66 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. या संशोधन केंद्राच्या इमारतीला सीरमचे सर्वेसर्वा पुनावाला कुटुंबीयांचे नाव देण्यात येणार असल्याचे सीरम युनिव्हर्सिटीकडून बुधवारी सांगण्यात आले. 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या AstraZeneca (AZN.L) आणि सीरम इंस्टीट्यूटच्या माध्यमातून कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी ब्रिटीश तोडीचे कोविड 19 च्या डोसचे वर्जन बनविण्याचा प्रयत्न असणार आहे. सीरम इंस्टीट्यूने Oxford-AstraZeneca COVID-19 vaccine निर्मित्तीत असलेल्या जेनर इंस्टीट्यूटशीदेखील सहमती दर्शवली आहे. तसेच, जेनरच्या R21/Matrix-M या मलेरियावरील डोसचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि विकासही या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

दरम्यान, सीरम इंस्टीट्यूटची स्थापना 1966 मध्ये पुण्यात करण्यात आली. सायरस मिस्त्री यांनी या संस्थेची स्थापन केली असून ते भारतातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्री यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने मानद पदवी बहाल केली आहे. 

Web Title: Adar Poonawala : India's billionaire Poonawalla family pledges $66 mln to Oxford University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.