आठवड्याचे 50 लाख! लसींचे बादशाह अदार पुनावाला लंडनमध्ये भाड्याने राहणार, अलिशान बंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:19 PM2021-03-25T14:19:45+5:302021-03-25T14:27:40+5:30

Adar Poonawalla gave boost to London's Real Estate: पुनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश Dominika Kulczyk यांच्याकडून हा अलिशान बंगला भाडेतत्वावर घेतला आहे. जवळपास 25 हजार वर्गफुट एवढा अवाढव्य हा बंगला आहे. या आकारात इंग्रजांचे सरासरी 24 घरे बसतात. 

Adar Poonawalla rents London mansion for 50 lakhs per week, a Mayfair record | आठवड्याचे 50 लाख! लसींचे बादशाह अदार पुनावाला लंडनमध्ये भाड्याने राहणार, अलिशान बंगला

आठवड्याचे 50 लाख! लसींचे बादशाह अदार पुनावाला लंडनमध्ये भाड्याने राहणार, अलिशान बंगला

Next

कोरोनाच्या कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे (serum institute) सीईओ अदार पुनावाला (Adar poonawala) यांनी लंडनमध्ये एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. या बंगल्याचे भाडेच एवढे आहे की तेथील मंदीत चाललेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बुस्ट मिळला आहे. एका आठवड्यासाठी पुनावाला त्या बंगल्याचे 50 लाख रुपये भाडे देणार आहेत. (The head of the world’s largest vaccine manufacturer Adar poonawala agreed to rent a property in Mayfair for about 50,000 pounds a week, a record for the exclusive London neighborhood.)


हा बंगला लंडनच्या पॉश असलेल्या मफेय़र भागात आहे. हा लंडनच नाही तर जगातील सर्वात महागड्या भागापैकी एक आहे. ब्लूमबर्गने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पुनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश Dominika Kulczyk यांच्याकडून हा अलिशान बंगला भाडेतत्वावर घेतला आहे. जवळपास 25 हजार वर्गफुट एवढा अवाढव्य हा बंगला आहे. या आकारात इंग्रजांचे सरासरी 24 घरे बसतात. 


या प्रॉपर्टीमध्ये एक गेस्ट हाऊस आणि एक सीक्रेट गार्डनदेखील आहे. या डीलमुळे लंडनच्या लक्झरी मार्केटला मोठा बूस्ट मिळणार आहे. ब्रेक्झिट आणि कोरोना महामारीमुळे तेथील रिअल इस्टेट व्यवसाय प्रभावित झाला होता. गेल्या पाच वर्षांत मफेयर भागातील भाडे जवळपास 9.2 टक्क्यांनी घसरले होते.

 
ब्रिटनमध्ये गरज का?
अदार पुनावाला यांना लंडनमध्ये घर भाड्याने घेण्याची गरज का पडली, असा सवाल उपस्थित होत आहे. पुनावाला यांच्या कंपनीने AstraZeneca सोबत करार करून कोरोनाचे करोडो डोस बनविले आहेत. यामुळे त्यांचे ब्रिटनला वारंवार येणेजाणे होत आहे. तसेच त्यांनी लंडनच्याच वेस्टमिनिस्टर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. या आधी त्यांनी मफेयरमधीलच ग्रॉसवेनोर हॉटेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते असफल झाले होते. पुनावाला यांचे कुटुंबीय हे जगातील अब्जाधीशांच्या रांगेत बसते. Bloomberg Billionaires Index नुसार त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ही 1,08,993 कोटी रुपये एवढी आहे.
 

Web Title: Adar Poonawalla rents London mansion for 50 lakhs per week, a Mayfair record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.