पाकिस्तानातील हिंदू मंदिरांना मिळणार अतिरिक्त सुरक्षा
By admin | Published: October 21, 2016 02:50 PM2016-10-21T14:50:44+5:302016-10-21T14:50:44+5:30
पाकिस्तानधील सिंध प्रांतात असणा-या हिंदू मंदिर, चर्च आणि गुरुद्वारांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 21 - पाकिस्तानधील सिंध प्रांतात असणा-या हिंदू मंदिर, चर्च आणि गुरुद्वारांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. 400 कोटींच्या एका प्रोजक्टचं अनावरण येत्या काही दिवसात होणार आहे. या प्रोजेक्टअंतर्गत सिंध प्रांतातील धर्मस्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. स्थानिक वृत्तवाहिनींनी यासंबंधी वृत्त दिलं आहे.
या प्रोजेक्टमध्ये प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेवर प्रामुख्याने लक्ष दिलं जाणार असल्याचं अधिका-याने सांगितलं आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-जरादरी यांनी दिलेल्या निर्देशानंतर हा प्रोजक्ट लागू करण्यात येत आहे. हैदराबाद, लरकाना तसंच इतर ठिकाणी हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सिंध प्रांतात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची एकूण 1253 धर्मस्थळ आहेत. यामध्ये 703 हिंदू मंदिरे, 523 चर्च आहेत. या धर्मस्थळांच्या सुरक्षेसाठी एकूण 2310 पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे.