अदनान खशोगी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 05:29 AM2017-06-09T05:29:27+5:302017-06-09T05:29:27+5:30
सौदी अरेबिया येथील प्रसिद्ध शस्त्रविक्रेते अदनान खशोगी यांचे लंडनमध्ये बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
इंग्लंड : सौदी अरेबिया येथील प्रसिद्ध शस्त्रविक्रेते अदनान खशोगी यांचे लंडनमध्ये बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
खशोगी यांचे जगभरातील व्यावसायिक व राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध होते. १९८० मध्ये बोफोर्स तोफ घोटाळा उघड झाल्यावर ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. त्यावेळी ओट्टाविओ क्वात्रोची व चंद्रास्वामी यांच्यामध्ये झालेला ६०० कोटी रुपयांचा बोफोर्स तोफ खरेदी करार खशोगी यांनी उघड केल्याचा आरोप होता. क्वात्रोची यांना अटक होऊन जामीन मिळाला होता. परंतु खशोगी स्वत:ला अटक होण्यापासून वाचविण्यास व भारताबाहेर राहण्यास यशस्वी ठरले होते. खशोगी त्यांच्या उच्च जीवनशैली, लक्झरी नौका नबिला व डीसी ९ या आलिशान विमानाकरिताही ओळखले जात होते. एकवेळी त्यांच्याकडे तीन बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. प्रिन्सेस डायनासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या दोडी अल फय्याद यांचे ते काका होते.