नात्यातील असुरक्षितता; फेसबुकवर सक्रिय...!

By Admin | Published: February 16, 2015 12:08 AM2015-02-16T00:08:43+5:302015-02-16T00:08:43+5:30

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अधिक सक्रिय राहणाऱ्यांमध्ये नात्यांबाबत असुरक्षिततेची भावना असते, असे एका संशोधनातून पुढे आले आहे.

Affordable affair; Active on Facebook ...! | नात्यातील असुरक्षितता; फेसबुकवर सक्रिय...!

नात्यातील असुरक्षितता; फेसबुकवर सक्रिय...!

googlenewsNext

न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अधिक सक्रिय राहणाऱ्यांमध्ये नात्यांबाबत असुरक्षिततेची भावना असते, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. लोकांचे लक्ष आकर्षित करण्याच्या उद्देशाने ते आपल्या वॉल अर्थात भिंतीवर सातत्याने टिपणी करीत असतात. तसेच असे लोक दुसऱ्यांच्या ‘पोस्ट’ला लाईक करणे आणि आपले स्टेट्स सतत बदल असतात.
अमेरिकी युनियन कॉलेजच्या एका संशोधन गटाने यासंदर्भात अभ्यास केला आहे. यात १८ ते ८३ या वयोगटातील सुमारे ६०० लोकांनी सहभाग घेतला. यातील सहभागींना दोन सर्वेक्षणांच्या माध्यमातून नजीकचे नातेवाईक आणि फेसबुकवरील त्यांच्या सवयींबाबत विचारणा करण्यात आली.
संशोधनात लक्षात आले की, फेसबुकवर सक्रिय राहणाऱ्यांत मुख्यत: दोन प्रकारचे लोक आहेत. एक, लोकांप्रती अधिक बांधिलकीची भावना असलेले आणि दोन, स्वत:चे मत अधिक ठामपणे मांडण्याची इच्छा असलेले.

Web Title: Affordable affair; Active on Facebook ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.