त्या 'अफगाणी मुली'ला पाकिस्तानमध्ये अटक
By Admin | Published: October 26, 2016 04:05 PM2016-10-26T16:05:57+5:302016-10-26T17:46:28+5:30
नॅशनल जिऑग्राफीकवरून 'अफगाण मुलगी' म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेल्या शारबात बिबी हिला बुधवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - नॅशनल जिऑग्राफीकवरून 'अफगाण मुलगी' म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेल्या शारबात बिबी हिला बुधवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिकेशन संस्थेने तिला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पेशावर येथून अटक केल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.
नॅशनल जिओग्राफीकचा छायाचित्रकार स्टीव्ह मॅककरी याने 1984 साली पेशावरमधील निर्वासितांच्या छावणीत शारबात बिबी हिचे छायाचित्र टिपले होते. त्यानंतर हे छायाचित्र नॅशनल जिओग्राफीकच्या 1985 सालातील जून महिन्याच्या अंकात प्रकाशित झाले. तेव्हा शारबात ही 'अफगाणी मुलगी' म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी तिचे वय अवघे 12 वर्षे होते. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीकने तिच्या जीवनावर एक लघुपटही बनवला. तसेच तिचा उल्लेख 'अफगाण युद्धातील मोनालिसा' असा केला होता.
दरम्यान, बुधवारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिला आटक केली. तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असे दुहेरी नागरिकत्व असलेल्या शारबात कडून दोन्ही देशाची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.