Afghanistan: तालिबानला घाबरून अफगाणिस्तानच्या पायलटांचा नोकरीला रामराम; लष्कर हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:36 PM2021-08-10T14:36:07+5:302021-08-10T14:38:27+5:30

Afghan Air Force pilot leaving job after taliban attack सर-ए-पुल, कुंदुज आणि तालोकान वर कब्जा केल्याच्या एक दिवस नंतर तालिबानने ऐबक ताब्यात घेतले. जरंज आणि शेबरघन शहरे गेल्याच आठवड्यात ताब्यात घेण्यात आली आहेत.

Afghan pilots quit their jobs in fear of Taliban; Army became helpless | Afghanistan: तालिबानला घाबरून अफगाणिस्तानच्या पायलटांचा नोकरीला रामराम; लष्कर हतबल

Afghanistan: तालिबानला घाबरून अफगाणिस्तानच्या पायलटांचा नोकरीला रामराम; लष्कर हतबल

Next

तालिबानने (Taliban) अफगानिस्तानवर (Afghanistan) जबरदस्त पक़ड मिळविण्यास सुरुवात केली आहे. पायदळ तालिबानींसोबत लढत असताना त्यांना कव्हर देणारे हवाईदल मात्र, गायब झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालिबानींनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने आणि वाईट परिस्थितीत असलेल्या लढाऊ विमानांमुळे अफगानिस्तानच्या हवाई दलाचे पायलट नोकरी सोडत आहेत. (Afghan Air Force pilot killed in Kabul bombing, attack claimed by Taliban)

तालिबानने एका आठवड्याच्या आत सहाव्या शहरावर कब्जा केला आहे. यामुळे अफगानिस्तान लष्कराचे मनोबल खच्ची होत आहे. अशातच तालिबान्यांवर हवाई हल्ले केले तर लष्कराची लढाई सोपी होई. परंतू पायलटच पळ काढू लागल्याने तालिबान्यांचे फावले आहे. समांगन प्रांताची राजधानी ऐबकवर सोमवारी जिहादी गटाने कब्जा केला. तालिबानने ट्विट करून सांगितले की, ऐबकचे सर्व सरकारी कार्य़ालये आणि पोलीस चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

सर-ए-पुल, कुंदुज आणि तालोकान वर कब्जा केल्याच्या एक दिवस नंतर तालिबानने ऐबक ताब्यात घेतले. जरंज आणि शेबरघन शहरे गेल्याच आठवड्यात ताब्यात घेण्यात आली आहेत.लश्कर गाह, कंधार आणि हेरातमध्ये भाषण युद्ध सुरु आहे. तर अफगानिस्तानच्या उत्तरेडील सर्वात मोठे शहर मजार-ए-शरीफ वर हल्ला करण्यात आला. 

आठ पायलटांची हत्या 
गेल्या काही आठवड्यांत आठ पायलटांची हत्या झाली आहे. यामध्ये ब्लॅक हॉक पायलट हमीदुल्लाह अज़ीमी देखील आहेत. शनिवारी त्यांच्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. काबुलजवळ बॉम्ब फुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये अन्य पाच नागरिक जखमी झाले. गेल्या काही दिवसांत 19 पायलटांनी हवाई दलाची नोकरी सोडली आहे. एका पायलटाने सांगितले की, नोकरीवर येताना दररोज वेगवेगळ्या कार, वाहनांमधून जावे लागते. काही मित्र आहेत त्यांच्या कार मागाव्या लागतात. घरातूनही बाजारात जाता येत नाही. केस कापायलाही जाऊ शकत नाही. मी आता नोकरी सोडण्य़ाचा विचार करत आहे. 

Web Title: Afghan pilots quit their jobs in fear of Taliban; Army became helpless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.