अफगाण अजूनही अत्यंत घातक

By admin | Published: May 27, 2014 06:00 AM2014-05-27T06:00:33+5:302014-05-27T06:00:33+5:30

ओसामा बिन लादेन याचा खात्मा व अल काईदाचे अनेक वरिष्ठ नेते मारले गेल्यामुळे या संघटनेची ताकद कमी झाली याबद्दल अमेरिकी सैनिकांचे कौतुक अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले

Afghan still extremely dangerous | अफगाण अजूनही अत्यंत घातक

अफगाण अजूनही अत्यंत घातक

Next

वॉशिग्टन : अल काईदा दहशतवादी संघटनेचा नेता ओसामा बिन लादेन याचा खात्मा व अल काईदाचे अनेक वरिष्ठ नेते मारले गेल्यामुळे या संघटनेची ताकद कमी झाली याबद्दल अमेरिकी सैनिकांचे कौतुक अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे; पण त्याचवेळी अफगाणिस्तान ही अजूनही अत्यंत घातक जागा असल्याचे म्हटले आहे. रविवारी रात्री ओबामा यांनी अचानक अफगाणिस्तानला भेट दिली. या भेटीत ओबामा यांनी अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांशी संवाद साधला. अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तानात केलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानणे या एकमेव उद्देशाने मी येथे आलो आहे असे ओबामा म्हणाले. अफगाणिस्तान आजही घातक व भयंकर आहे. येथे दहशतवादी निष्पाप नागरिकांवर हल्ला करतात; पण येथे जी प्रगती झाली आहे, त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकतात. लोकांना आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा मिळत असून, त्यांचे जीवन बरेच सुसह्य झाले आहे, असे ते म्हणाले. अफगाण सैनिक आता बळकट होत असून, ते आपल्या देशाची सुरक्षा करूशकतील. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत लोकांनी दहशतवादाची भीती झुगारून मोठे मतदान केले. दरम्यान, अफगाण राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी काबूलबाहेरील बगराम लष्करी तळावर भेट घेण्याचा बराक ओबामा यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. करझाई यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनानुसार, करझार्इंच्या मते, अफगाण परंपरेनुसार अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्याची तयारी आहे; मात्र त्यांचा बगराम येथे ओबामा यांची भेट घेण्याचा कोणताही विचार नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Afghan still extremely dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.