अफगाणिस्तान पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं, 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 05:16 AM2017-11-24T05:16:49+5:302017-11-24T17:11:19+5:30

अफगानिस्तान : जलालाबाद पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. शहरातील एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं होतं.

Afghan suicide bomb blasts again, 8 deaths | अफगाणिस्तान पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं, 8 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तान पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं, 8 जणांचा मृत्यू

Next

अफगाणिस्तान : जलालाबाद पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. शहरातील एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं होतं. त्या माजी पोलीस प्रमुखाच्या समर्थनात नांगरहारमध्ये निदर्शनं सुरू होती. त्या गर्दीचा फायदा घेत दहशतवादी आत शिरला आणि त्यानं आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर लहानग्यांसह जवळपास 15 जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलीस अधिका-यानी व्यक्त केली. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली आहे. आत्मघाती बॉम्बस्फोटातील जखमीही गंभीर असल्याची माहिती आरोग्य संचालक नजीब कमावल यांनी दिली आहे. नांगरहारमध्ये तालिबान आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया(इसिस) सक्रिय आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी कंधारमधल्या लष्करी तळालाही तालिबानच्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. तालिबानच्या दहशतवाद्यांनी घडवून आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 सैनिकांचा मृत्यू झाला होता. तसेच 9 सैनिक जखमी झालेत. तालिबाननं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तालिबाननं हल्ला केला त्यावेळी लष्करी तळावर 60 सैनिक तैनात होते. त्यातील 43 सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर 9 सैनिक गंभीररीत्या जखमी होते. त्यांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.   

Web Title: Afghan suicide bomb blasts again, 8 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.