अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अफगाण तालिबानचा म्होरक्या ठार
By admin | Published: May 22, 2016 12:49 PM2016-05-22T12:49:43+5:302016-05-22T12:52:03+5:30
अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर ठार झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २२ - अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर ठार झाला आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या वरिष्ठ कमांडरने ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मन्सूर ठार झाला असे मुल्ला अब्दुल रौफने रविवारी असोसिएट प्रेसला सांगितले.
अफगाणिस्ता-पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात झालेल्या हवाई हल्ल्यात मन्सूर ठार झाला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांच्या कार्यालयाने हवाई हल्ल्याला दुजोरा दिला असला तरी, मन्सूरच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही.
अफगाणि दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील दुर्गम भागांमध्ये हवाई हल्ले केले. पेंटागॉनचे प्रवक्ते पीटर कूक यांनी मन्सूरला लक्ष्य करण्यासाठी हवाई हल्ले केल्याचे स्पष्ट केले पण त्याच्या जिंवत किंवा मृत असण्याबद्दल काहीही म्हटलेले नाही.