'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं UNSCच्या बैठकीत कडक शब्दांत सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 08:34 AM2021-09-10T08:34:51+5:302021-09-10T08:36:18+5:30

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे.

Afghan territory should not be used to attack any country Tirumurti at UNSC meeting | 'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं UNSCच्या बैठकीत कडक शब्दांत सुनावलं

'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं UNSCच्या बैठकीत कडक शब्दांत सुनावलं

Next

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि नाजूक असल्याचं म्हटलं आहे. एक शेजारी देश आणि देशातील नागरिकांसोबत मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे अफगाणिस्तानातील सद्यस्थितीनं आम्ही चिंतेत आहोत, असं भारतानं म्हटलं आहे. (Afghan territory should not be used to attack any country Tirumurti at UNSC meeting)

"अफगाणिस्तानातील चिमुकल्यांची स्वप्न साकार करणं आणि अल्पसख्यांकांच्या अधिकारांची सुरक्षा आपल्याला करावी लागेल. देशातील सर्व वर्गांचा सन्मान होईल अशी सर्वसमावेशक व्यवस्था प्रस्थापित करण्याचं आवाहन आम्ही अफगाणिस्तानला करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्वीकारार्हता आणि वैधता प्राप्त होईल असं असं सरकारर अफगाणिस्तानात स्थापन व्हावं. यासाठी दहशतवादाविरोधात जी वचनं दिली गेली आहेत. त्याचा सन्मान आणि पालन केलं जाईल याची काळजी अफगाणिस्तानला घ्यावी लागेल", असं टीएस तिरुमूर्ती म्हणाले. 

अफगाणिस्तानातील नागरिक कोणत्याही अडथळ्याविना परदेश दौरा करू शकतील असं तालिबाननं वचन दिलं आहे. त्याचं पालन केलं जाईल अशी आशा आम्हाला आहे, असंही तिरुमूर्ती म्हणाले. 

अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये
गेल्या महिनाभरात अफगाणिस्तानात नाट्यमय घडामोडी घडत असून सारं जग याचं साक्षीदार आहे. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन तीनवेळा बैठक झाली. यात आम्ही काही चिंतेचे मुद्दे उपस्थित केले. विशेषत: दहशतदवादाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवाया आणि ट्रेनिंगसाठी होणार नाही अशी ग्वाही तालिबाननं दिली आहे. यासोबतच जगात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही किंवा त्यांना अर्थपुरवठा देखील केला जाणार नाही असं आश्वासन तालिबान्यांनी दिलं आहे. याचं पालन केलं जाईल अशी आशा आम्हाला आहे, असं टीएस तिरुमूर्ती म्हणाले. 

Web Title: Afghan territory should not be used to attack any country Tirumurti at UNSC meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.