अफगाणला एक हजार ‘जयपूर फूट’ देणार

By admin | Published: May 19, 2014 03:41 AM2014-05-19T03:41:24+5:302014-05-19T03:41:24+5:30

जयपूर फूट ही भारतीय संघटना अफगाणिस्तानातील १,००० नागरिकांसाठी कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून देणार आहे.

Afghān will give 1000 thousand 'jaipur' foot | अफगाणला एक हजार ‘जयपूर फूट’ देणार

अफगाणला एक हजार ‘जयपूर फूट’ देणार

Next

काबूल : जयपूर फूट ही भारतीय संघटना अफगाणिस्तानातील १,००० नागरिकांसाठी कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून देणार आहे. जयपूर फूटने अपंग आणि पोलिओग्रस्त लोकांना एक हजार कृत्रिम अवयवांचा पुरवठा करण्यासाठी अफगाण सरकारशी करार केला आहे. अफगाणिस्तानच्या कामगार आणि सामाजिक व्यवहारमंत्री अमीना अफजाली म्हणाल्या, जयपूर फूट ही भारतीय संघटना देशातील एक हजार अपंगांसाठी मोफत कृत्रिम अवयवांचा पुरवठा करणार आहे. यासाठी कंपनीने सहमती दर्शविली आहे. रस्त्याशेजारील बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले आणि पोलिओ यामुळे पाय गमवावे लागलेल्यांना जयपूर फूट मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणार आहे. जयपूर फूटच्या या उपक्रमामुळे उभय देशांतील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमीना अफजाली आणि जयपूर फूटचे संस्थापक डॉक्टर मेहता यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब झाले. अफगाणिस्तानातील भारताचे राजदूत अमर सिन्हा यांनी अफगाणिस्तानला सर्वतोपरी सहकार्य करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: Afghān will give 1000 thousand 'jaipur' foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.