Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:52 AM2021-09-06T07:52:21+5:302021-09-06T08:00:47+5:30

Panjashir Taliban War: पंजशीरमध्ये तालिबानी दहशतवादी आणि विरोधी गट रेझिस्टंस फ्रंट यांच्यात जोरदार युद्ध सुरु आहे. एकेकाळी हा प्रांत रशियाच्या सैन्यालाही जिंकता आला नव्हता. रशियाच्या रणगाड्यांचे भग्नावषेश आजही तेथील रस्त्यांच्या कडेला त्या घणघोर युद्धाची साक्ष देतात. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे.

Afghanistan: Ahmed Masood close aid Fahim Dashty killed in Taliban attack in Panjashir | Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार

Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार

Next

अफगाणिस्तानावर (AFghanistan) कब्जा केल्यानंतर तालिबानने (Taliban) पंजशीर (Panjashir) ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने काबूल विमानतळ सोडण्याची वाट पाहिली. अमेरिका जाण्याचा दिवस उजाडताच तालिबानने पंजशीरवर जोरदार हल्ला चढविला. आजवर अजिंक्य़ ठरलेला प्रांत हळूहळू तालिबानच्या ताब्यात येऊ लागला आहे. एकूण चार जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा तालिबानने केला आहे. दरम्यान पंजशीरच्या सिंहाचा मुलगा अहमद मसूद याला तगडा झटका बसला आहे. महत्वाचा सहकारी या लढ्यात मारला गेला आहे. (Afghan Resistance Front spokesman Fahim Dashti, top commander killed in Panjshir war with Taliban)

सावधान! अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यानं भारताला धोका; CIA च्या माजी अधिकाऱ्याचा दावा

पंजशीरमध्ये तालिबानी दहशतवादी आणि विरोधी गट रेझिस्टंस फ्रंट यांच्यात जोरदार युद्ध सुरु आहे. एकेकाळी हा प्रांत रशियाच्या सैन्यालाही जिंकता आला नव्हता. रशियाच्या रणगाड्यांचे भग्नावषेश आजही तेथील रस्त्यांच्या कडेला त्या घणघोर युद्धाची साक्ष देतात. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे. मसूदसोबत असलेले व अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष घोषित करून घेणारे सालेह यांनी कालच पंजशीरच्या दोन ते अडीज लाख लोकांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. तसेच युनोकडे मदतही मागितली होती. त्यातच आज अहमद मसूद यांचे सहकारी आणि रेझिस्टंस फ्रंटचा प्रवक्ता फहीम दश्ती (Fahim Dashti) याचा तालिबानशी लढताना मृत्यू झाला. 



 

अफगाणिस्तान न्यूज चॅनल टोलो न्यूजने सुत्रांच्या हवाल्याने दश्ती यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. घाटीमध्ये युद्धावेळी दश्ती यांचा रविवारी मृत्यू झाला. याशिवाय नॅशनल रेझिस्टंस फ्रंट ऑफ अफगाणिस्तानच्या फेसबुक पेजवरून देखील याची माहिती देण्यात आली आहे. फेसबुक पोस्टमध्ये आम्ही दोन भावांना गमावले आहे, सहकाऱ्यांना आणि फायटर्सना आम्ही गमावले. 

या पोस्टमध्ये दुसऱ्या नेत्याचेदेखील नाव देण्यात आले आहे. सोव्हिएतविरोधात लढलेल्या आणखी एका नेत्याच्या भाच्याचा म्हणजेच जनरल साहिब अब्दुल वदूद झोर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहेत. सालेह पंजशीरमध्ये एका अज्ञात जागी आहेत. तर अहमद मसूद गेल्या तीन दिवसांपासून ताजिकिस्तानात आहेत.

 

Web Title: Afghanistan: Ahmed Masood close aid Fahim Dashty killed in Taliban attack in Panjashir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.