मोठी बातमी: अफगाणिस्तानची तालिबानवर सर्वात मोठी कारवाई; एअरस्ट्राइकमध्ये 254 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 01:58 PM2021-08-01T13:58:18+5:302021-08-01T14:01:24+5:30

वेगवेगळ्या एअरस्ट्राइकमध्ये अफगाणिस्तानने जवळपास 254 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर जवळपास 97 दहशतवादी जखमी झाल्याचे बोलले जाते. (Afghanistan airstrike on taliban terrorists)

Afghanistan airforce airstrike on taliban terrorists 254 killed | मोठी बातमी: अफगाणिस्तानची तालिबानवर सर्वात मोठी कारवाई; एअरस्ट्राइकमध्ये 254 दहशतवाद्यांचा खात्मा

संग्रहित छायाचित्र.

Next

अफगाणिस्तान एअरफोर्सने तालिबानवर मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या एअरस्ट्राइकमध्ये अफगाणिस्तानने जवळपास 254 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर जवळपास 97 दहशतवादी जखमी झाल्याचे बोलले जाते. अफगाण सैनिकांनी 24 तासांत काबूल, कंदहार, कुंदूज, हेरात, हेलमंद आणि गझनीसह दहशतवाद्यांच्या एकूण 13 ठिकानांवर एअरस्ट्राइक केले. (Afghanistan airforce airstrike on taliban terrorists 254 killed)

तालिबानी दहशतवाद्यांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई -
सांगण्यात येते, की अफगाणिस्तानने तालिबानी दहशतवाद्यांवर केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात भरलेले एक वाहन उडवण्यात आले. यादरम्यान अफगाण सैनिकांनी 13 आयईडीही डिफ्यूज केले. कालही अफगाणिस्तानच्या हवाई दलाने कंदहार येथील तालिबानी दहशतवाद्यांच्या बंकर्सना निशाणा केले होते. या कारवाईत 10 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

अमेरिकेचे अफगाणिस्तानात जबरदस्त बॉम्ब हल्ले; उद्धवस्त केले तालिबानचे अड्डे

वेगाने पाय पसरत चाललाय तालिबान - 
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतत असतानाच, तेथे पुन्हा एकदा तालिबानी दहशतवाद्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यात तेथे दहशतवादी हल्लेही वाढले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर कब्जा करायला सुरुवात केली आहे. अनेक शेजारील देशांना लागून असलेल्या सीमेवरही त्यांनी नियंत्रण मिळवे आहे. तसेच अनेक प्रांतांच्या राजधान्यांवरही तालिबान कब्जा करण्याची भीती आहे. अमेरिकन-नाटो सैनिकांचे परतण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. 31 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल.

85 भागांवर कब्जा मिळवल्याचा तालिबानचा दावा -
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय होते. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

अफगाणिस्तानमध्ये शंभरावर नागरिकांची गोळ्या घालून हत्या

24 हजार तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा
गेल्या चार महिन्यात 5 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, अफगाण सुरक्षा दलाच्या कारवाईत जवळपास 24 हजार तालिबान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तान सरकारने ही माहिती दिली. तालिबानने अफगाणिस्तानमधील विविध भागांमध्ये 22 हजार हल्ले केले. तसेच मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या 398 जिल्ह्यांपैकी 250 जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.
 
 

Web Title: Afghanistan airforce airstrike on taliban terrorists 254 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.