अफगाणिस्तानात शिखांच्या वाहनावर आत्मघातकी हल्ला, 20 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 09:43 AM2018-07-02T09:43:43+5:302018-07-02T11:24:16+5:30
राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या दौ-यानंतर रविवारी अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
काबूल- राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या दौ-यानंतर रविवारी अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या आत्मघातकी हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्यानं 20 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात स्थानिक शीख आणि हिंदू अल्पसंख्याक समुदायातील 17 जणांचा समावेश आहे.
मृतांमध्ये शीख समुदायातील प्रमुख राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या जास्त करून शीख अल्पसंख्याक समुदायातील आहेत. तर काबूलस्थित भारतीय दूतावासानं 10 शीख अल्पसंख्याकांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्लाचा निषेध नोंदवला आहे.
"My heartfelt condolences to the families of the victims of the terror attack in Jalalabad city of Afghanistan. We are with them in this hour of tragedy.
— ANI (@ANI) July 2, 2018
I am meeting their relatives today at 6 pm in JN Bhavan," tweets EAM Sushma Swaraj (File pic) pic.twitter.com/KCXgMsP611
अतिरेक्यांशी सरकारचे युद्धच सुरू असलेल्या अफगाणिस्तानात गेल्या 24 तासांत 25 अतिरेकी ठार तर इतर 23 जण जखमी झाले, असे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी निवेदनात म्हटले. मृतांत पाच जण हे कडव्या इस्लामिक स्टेटशी (आयएस) तर उर्वरीत तालिबान अतिरेकी आहेत. या कारवाईत अनेक शस्त्रे आणि दारुगोळा व अँटी व्हेईकल माईन्स हाती लागले आहेत.