अफगाणिस्तानमध्ये भीषण कार बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू तर 60 जखमी

By admin | Published: June 22, 2017 02:47 PM2017-06-22T14:47:29+5:302017-06-22T15:00:44+5:30

अफगाणिस्तानमधील हेमलंड प्रांताची राजधानी लष्कर गाह येथे भीषण स्फोट झाला आहे

In Afghanistan, a car bomb exploded, 24 killed and 60 injured | अफगाणिस्तानमध्ये भीषण कार बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू तर 60 जखमी

अफगाणिस्तानमध्ये भीषण कार बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू तर 60 जखमी

Next
ऑनलाइन लोकमत
लष्कर गाह, दि. 22 - अफगाणिस्तानमधील हेमलंड प्रांताची राजधानी लष्कर गाह येथे भीषण स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट घडवण्यात आला असून, स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 60 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढू शकतो. अफगाणिस्तान गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा स्फोट झाला. 
 
हेमलंड प्रांताचे प्रवक्ता उमर ज्वाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ""24 हून जास्त जणांचा मृत्यू झाला असून, 60 हून अधिक जखमी आहेत. जखमी आणि मृतांमध्ये पोलीस, लष्कर, स्थानिक आणि न्यू काबूल ब्रांचच्या कर्मचा-यांचा समावेश आहे"". 
 
टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, स्फोट झाला तेव्हा लोक एका बँकेबाहेर आपला पगार घेण्यासाठी जमा झाले होते. स्फोटानंतर जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. 
 
अद्याप हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. याआधीही तालिबान आणि इसीसने अशाप्रकारे बँकांमध्ये पोलीस, जवान आणि सरकारी कर्मचारी पगार घेण्यासाठी जमा झाले असताना टार्गेट केलं आहे. गेल्या महिन्यात गारदेज येथील पुर्व शहरात झालेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.
 

Web Title: In Afghanistan, a car bomb exploded, 24 killed and 60 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.