Afghanistan crisis : बांग्लादेशनं चीनची री.. ओढली, तालिबान सरकारला मैत्रीपूर्ण समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 03:52 PM2021-08-17T15:52:03+5:302021-08-17T16:09:57+5:30

Afghanistan crisis : अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे.

Afghanistan crises : Bangladesh pulls out of China, friendly support to Taliban government in afghanistan | Afghanistan crisis : बांग्लादेशनं चीनची री.. ओढली, तालिबान सरकारला मैत्रीपूर्ण समर्थन

Afghanistan crisis : बांग्लादेशनं चीनची री.. ओढली, तालिबान सरकारला मैत्रीपूर्ण समर्थन

Next

नवी दिल्ली - अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील राष्ट्रपती भवनावर रविवारी तालिबान्यांनी कब्जा केला. त्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्याचं तालिबान्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून निघून गेले आहेत. काबुलच्या सध्याच्या परिस्थितीबाबत जगभर चर्चा असून भारताचा शेजारील देश असल्याने आता अफगाणिस्तान आणि भारत या उभय देशांमधील संबंधावर चर्चा घडत आहेत. त्यातच, 4 राज्यांनी तालिबान सरकारचे समर्थन केल्यानंतर आता बांग्लादेशनेही स्वागत केले आहे.  

अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान, चीन, रशिया आणि तुर्की हे चार देश अफगाणिस्तानमधील आपले दुतावास बंद करणार नाहीत. तालिबान सरकारमध्येही या देशांचे दुतावास सुरूच राहणार असल्याचे समजते. दरम्यान, तालिबान सरकारसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार असल्याचं चीननं आज स्पष्ट केलं आहे. त्यानंतर, आता बांग्लादेशनेही चीनची री ओढल्याचे दिसून येते. 

बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमेन यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला आपलं समर्थन दर्शवलं आहे. येथील तालिबान सरकार हे जनतेचं सरकार आहे, त्यामुळे बांग्लादेश तालिबान सरकारचा स्विकार करेल, असे मंत्री मोमेन यांनी म्हटले आहे. नवीन सरकार कोणाचं बनतं, याने आम्हाला फरक पडत नाही. जर तालिबानच सरकार बनत असेल, किंवा बनले असेल. तर, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असतील. आमचा लोकशाही सरकारवर विश्वास आहे, असेही मोमेन यांनी स्पष्ट केले. बांग्लादेशचे सर्वच देशांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे तालिबानचंही समर्थन करण्यास आपण तयार आहोत. अफगाणिस्तानचा विकास व्हावा, हीच आपली इच्छा आहे. त्यामुळे, याकडे आपण मित्रत्त्वाच्या भावनेतून पाहतो, असेही मोमेन यांनी म्हटले आहे.   

चीन, पाकिस्तान, रशिया आणि तुर्कीचंही समर्थन

एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला आपण तयार आहोत, असे चीनने म्हटले आहे. तर, तालिबानच्या व्यवहारावर सर्वकाही निर्भर राहीन, असे रशियाने म्हटले आहे. दरम्यान, तालिबानचे मुख्यालय पाकिस्तानमध्येच आहे. त्यामुळे, पाकिस्तानकडून तालिबान सरकारला मान्यता दिली जाईल, असेच दिसून येते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारास पाकिस्तानकडूनच खतपाणी मिळत असल्याचं भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले होते. दुसरीकडे तुर्कीतील बहुतांश लोक या बदलाला संधी समजत आहेत.  

तालिबानचं भारताबद्दलच मत 

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानच्या नवनिर्माणासाठीचा तालिबानचा रोडमॅप पूर्णपणे तयार असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल असंही तालिबानकडून सांगण्यात आलं आहे. "भारत लवकरच आपल्या भूमिकेत बदल असेल अशी आशा आहे. कारण याआधी भारत इथं थोपविण्यात आलेल्या सरकारची बाजू घेऊन बोलत होता. त्यामुळे आता येणाऱ्या नव्या सरकारचीच ते बाजू घेतील कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचं ठरेल", असं तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीननं म्हटलं आहे.

Web Title: Afghanistan crises : Bangladesh pulls out of China, friendly support to Taliban government in afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.