Afghanistan Crisis: तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना धक्का; ३०० दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:35 AM2021-08-23T07:35:52+5:302021-08-23T07:37:50+5:30

Afghanistan Crisis: पंजशीर ताब्यात घेण्याचे तालिबानचे मनसुबे धुळीला; बंडखोरांचा कडवा प्रतिकार

Afghanistan Crisis 300 Taliban Fighters Killed In Ambush Attack Of Panjshir Resistance Forces | Afghanistan Crisis: तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना धक्का; ३०० दहशतवादी ठार

Afghanistan Crisis: तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना धक्का; ३०० दहशतवादी ठार

Next

काबुल: तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा करून आठवडा उलटला आहे. गेल्या आठवड्याभरापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती संपूर्ण जग पाहात आहे. लाखो लोक असहाय आहेत. अनेकांना देश सोडायचा आहे. विमानतळावर चेंगराचेंगरी सुरू आहे. काही जणांना त्या चेंगराचेंगरीत, गोळीबारात जीव गमवावा लागला आहे. मात्र अफगाणिस्तानातला एक प्रांत अद्यापही स्वतंत्र आहे. २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानची राजवट होती. मात्र तेव्हा पंजशीर प्रांतावर तालिबानला कब्जा करता आला नव्हता. आता पुन्हा एकदा पंजशीरनं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती घडवली आहे.

काबुल ताब्यात घेताच तालिबाननं बंडखोरांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पंजशीर खोऱ्याकडे लक्ष वळवलं. मात्र अमेरिकन बनावटीच्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या तालिबान्यांना पंजशीरमधल्या बंडखोरांनी जोरदार दणका दिला आहे. तालिबान्यांचे ३०० दहशतवादी मारले गेले आहेत. तालिबाननं कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाहच्या नेतृत्त्वाखाली पंजशीरवर हल्ला करण्यासाठी शेकडो दहशतवादी पाठवले होते. मात्र बगलान प्रांतातल्या अंदराब खोऱ्यात लपून बसलेल्या पंजशीरच्या बंडखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ३०० तालिबानी मारले गेले. यामुळे तालिबान्यांना मिळणारा रसद पुरवठा बंद झाला आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून पंजशीर खोऱ्यात बंडखोर एकत्र येऊ लागले. यातील बहुतांश जण अफगाण राष्ट्रीय लष्कराचे सैनिक आहेत. त्यांचं नेतृत्त्व नॉर्दन अलायन्सचे प्रमुख राहिलेले माजी मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करत आहेत. त्यांच्यासोबत माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि बल्ख प्रांताचे माजी गव्हर्नर यांची तुकडीदेखील आहे. पंजशीरमध्ये ९ हजार बंडखोर सैनिक आहेत. 

Web Title: Afghanistan Crisis 300 Taliban Fighters Killed In Ambush Attack Of Panjshir Resistance Forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.