Afghanistan Crisis: जगभरातील देशांनी निर्वासितांसाठी सीमा खुल्या कराव्या - मलाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 06:22 AM2021-08-18T06:22:25+5:302021-08-18T06:22:48+5:30
Afghanistan Crisis: जागतिक नेत्यांना तत्काळ शस्त्रसंधी करण्याचे तसेच निर्वासितांसाठी सीमा खुल्या कराव्या, असे आवाहन मलाला यांनी केले आहे.
Next
लंडन : नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मलाला युसूफजई अफगाणिस्तानमधील महिला, अल्पसंख्यांक यांच्याबाबत चिंतेत आहेत. जागतिक नेत्यांना तत्काळ शस्त्रसंधी करण्याचे तसेच निर्वासितांसाठी सीमा खुल्या कराव्या, असे आवाहन मलाला यांनी केले आहे.
मलाला यांनी ट्विटमध्ये म्हटले की, तालिबाननेअफगाणिस्तानला कब्जात घेतले आणि आम्ही हे सुन्नपणे पाहत आहोत. महिला, अल्पसंख्याक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांची काळजी वाटते. जागतिक आणि विभागीय व स्थानिक शक्तींनी तत्काळ शस्त्रसंधी करून, तत्काळ मानवतावादी मदत द्यावी, तसेच निर्वासित आणि नागरिकांचे रक्षण करावे. त्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत.