Afghanistan: तालिबानला रोखू शकला नाही, तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार? चीनने उडविली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:05 PM2021-08-17T17:05:38+5:302021-08-17T17:07:48+5:30

China mocked on America after Afghanistan crisis: चीनने व्हिएतनाम आणि सिरिया युद्धाचे उदाहरण दिले. अमेरिका मदत करण्याऐवजी परिस्थिती बिघडली की पळून जाते. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यावर संपादकीय लेख लिहीला आहे. अमेरिका बेभरवशी आणि अविश्वासू आहे, असे म्हटले आहे. 

Afghanistan crisis: how can America fight with us in Taiwan? not stopped Taliban: China | Afghanistan: तालिबानला रोखू शकला नाही, तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार? चीनने उडविली खिल्ली

Afghanistan: तालिबानला रोखू शकला नाही, तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार? चीनने उडविली खिल्ली

Next

अफगानिस्तान   (Afghanistan) मधील निर्माण झालेल्या परिस्थितीवरून चीनने (China) अमेरिकेवर (America) जोरदार निशाना साधला आहे. तालिबानचे (Taliban) उदाहरण देत चीनने तैवानलाही (Taiwan) धमकी देऊन टाकली आहे. अफगानिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यावर लगेचच तेथील सरकार पडले आहे. जगाने पाहिले की तालिबानचे लोक तेथील राष्ट्रपती भवनात कसे घुसले आणि अमेरिकेला कसे त्यांच्या अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढावे लागले. यामुळे अमेरिकेच्या विश्वासाला मोठा तडा गेल्याचे चीनने म्हटले आहे. (If not control taliban, then how can save Taiwan; China Target America.)

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

चीनने व्हिएतनाम आणि सिरिया युद्धाचे उदाहरण दिले. अमेरिका मदत करण्याऐवजी परिस्थिती बिघडली की पळून जाते. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यावर संपादकीय लेख लिहीला आहे. अमेरिका बेभरवशी आणि अविश्वासू आहे, असे म्हटले आहे. 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कुत्र्याच्या मृत्यूवेळी शोकसंदेश पाठविणाऱ्या तैवानच्या नेत्या साई इन वेंग यांनी अफगानमधील परिस्थितीवर एक चकार शब्दही काढलेला नाही. अब्ज, खरब डॉलर्स खर्च करून, 20 वर्षे युद्ध करून अमेरिका तालिबानला संपवू शकली नाही. मग तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार असा सवाल करत एकप्रकारे अमेरिकेची खिल्ली उडविली आहे. 

Afghanistan: जेव्हा ISI चीफ म्हणालेला, 'अमेरिकेला अमेरिकेच्याच मदतीने अफगानिस्तानमध्ये हरवणार'

अफगानिस्तानातील खर्च अमेरिकेला परवडत नव्हता. अफगानिस्तानचे भू-राजनीतिक मूल्य तैवानपेक्षा कमी नाहीय. तिथे अमेरिकेचे तीन कट्टर विरोधी देश आहेत. खुद्द अफगानिस्तानमध्ये अमेरिकाविरोधी विचारांचा गड आहे. तैवानमध्ये अमेरिकेचे कोणतेही सैन्य नाहीय. यामुळे अमेरिकेला तैवानचा काहीच खर्च नाहीय. उलट चीनविरोधात तैवानला शस्त्रे, मांस विकते. फायदा अमेरिकेलाच होतो. यामुळे तैवान आणि चीनमध्ये वैचारिक अंतर असल्याचे ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे. 

Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले

जर चीनने तैवानवर कब्जा केला तर अमेरिकेला अफगानिस्तान, सिरीया, व्हिएतनामपेक्षा जास्त ताकद लावावी लागेल. यामुळे अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

Web Title: Afghanistan crisis: how can America fight with us in Taiwan? not stopped Taliban: China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.