Afghanistan Crisis, Kashmir Issue: "तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील’’, या महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:05 PM2021-08-24T12:05:52+5:302021-08-24T12:06:49+5:30

Afghanistan Crisis, Kashmir Issue: पीटीआयच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी हे विधान केले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असे विधान त्यांनी केले आहे.

Afghanistan Crisis, Kashmir Issue: "Taliban will come and conquer Kashmir and give it to Pakistan", PTI's leader claims | Afghanistan Crisis, Kashmir Issue: "तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील’’, या महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

Afghanistan Crisis, Kashmir Issue: "तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील’’, या महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

Next

इस्लामाबाद - अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा केल्यानंतर पाकिस्तानकडून या संघटनेचे उघडपणे समर्थन केले जात आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिका समर्थित सरकारला उखडून टाकणाऱ्या तालिबानलापाकिस्तानकडून आधीपासूनच मदत होती. (Afghanistan Crisis) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष तहरिक ए इंसाफकडून  तालिबानची सत्ता आल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (Kashmir Issue) यादरम्यान, आता या पक्षाच्या एका महिला नेत्याने काश्मिरबाबत खळबळजनक दावा केला आहे. पीटीआयच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी हे विधान केले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असे विधान त्यांनी केले आहे. ( "Taliban will come and conquer Kashmir and give it to Pakistan", PTI's leader claims)

इम्रान खानच्या तहरीक ए इंसाफ या पक्षाच्या सदस्य असलेल्या नीलम इरशाद शेख यांनी हा दावा पाकिस्तानमधील बोल टीव्हीच्या एका डिबेट शोमध्ये केला होता. तालिबान आणि आयएसआय यांच्यात निकटचे संबंध असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नीलम म्हणाल्या की, इम्रान खान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानचा सन्मान वाढला आहे. तालिबानी ते आमच्यासाोबत असल्याचे सांगतात. आता ते आम्हाला काश्मीर जिंकून देतील. तालिबान तुम्हाला काश्मीर  जिंकून देतील, असे तुम्हाला कुणी सांगितले असता त्या म्हणाल्या की, भारताने आमचे तुकडे केले आहेत. आता आम्ही पुन्हा एक होऊ. आमच्या सैन्याकडे लष्कर आहे. तालिबान आम्हाला सहकार्य करत आहे. कारण जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला होता. तेव्हा पाकिस्तानने त्यांची मदत केली होती. आता ते आम्हाला साथ देतील.

एकीकडे पाकिस्तावर तालिबानी दहशतवाद्यांना उघडपणे मदत करत असल्याचे आरोप होत असतानाच नीलम यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. अफगाणिस्तानमधील युद्धावेळी हजारोंच्या संख्येने दहशतवादी पाकिस्तानमधील आदिवासी भागातून अफगाणिस्तानमध्ये गेले होते. आथा पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने पुन्हा एकदा तालिबानची सत्ता अफगाणिस्तानमध्ये आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी तालिबानी योद्ध्यांना सर्वमान्यान्य नागरिक म्हटले होते. अफगाणिस्तानमध्ये रक्ताची होळी खेळणारे तालिबानी दहशतवादी नाही तर सर्वसामान्य नागरिक आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील सारे काही बर्बाद केले आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले होते. 

Web Title: Afghanistan Crisis, Kashmir Issue: "Taliban will come and conquer Kashmir and give it to Pakistan", PTI's leader claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.