Afghanistan: मोस्ट वॉन्टेड खलील हक्कानी 8 किमीवर होता; अमेरिकन सैन्य नुसते पाहत राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 10:55 AM2021-08-22T10:55:30+5:302021-08-22T10:58:41+5:30

Haqqani Network Khalil Haqqani in Kabul Crowd: हक्कानी नेटवर्कचा (Haqqani Network) प्रमुख खलील हक्कानी (Khalil Haqqani) खुलेआम काबुलमध्ये फिरू लागला आहे. यावरून अफगानिस्तानवरून  (Afghanistan) अमेरिकेचे किती खच्चीकरण झाले ते दिसत आहे. या हक्कानीवर अमेरिकेने 10 वर्षांपूर्वी 37.15 कोटींचे बक्षीस ठेवले आहे. लादेनला पाकिस्तानात जाऊन मारले होते.

Afghanistan crisis: Khalil Haqqani takes charge of Kabul; American army only watching | Afghanistan: मोस्ट वॉन्टेड खलील हक्कानी 8 किमीवर होता; अमेरिकन सैन्य नुसते पाहत राहिले

Afghanistan: मोस्ट वॉन्टेड खलील हक्कानी 8 किमीवर होता; अमेरिकन सैन्य नुसते पाहत राहिले

Next

अमेरिकेचा (America) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हक्कानी नेटवर्कचा (Haqqani Network) प्रमुख खलील हक्कानी (Khalil Haqqani) अमेरिकी सैन्याच्या केवळ 8 किमी दूरवर काबुलमध्ये खुलेआम नारेबाजी करताना दिसला आहे. मात्र, जगातील सर्वात शक्तीशाली ताकद काबुलच्या विमानतळावर हात बांधून त्याला पाहत राहिले. यावरून अफगानिस्तानवरून  (Afghanistan) अमेरिकेचे किती खच्चीकरण झाले ते दिसत आहे. या हक्कानीवर अमेरिकेने 10 वर्षांपूर्वी 37.15 कोटींचे बक्षीस ठेवले आहे. लादेनला पाकिस्तानात जाऊन मारले होते. मात्र, हक्कानीबाबतची अमेरिकेची असहायता साऱ्या जगाला आश्चर्यचकित करणारी आहे. (America's Most wanted rewarded Terrorist Khalil Haqqani is at 8km far only.)

Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ

खलीलने काबुलच्या सर्वात मोठ्या मशीदीवरून लोकांना संबोधित केले. यावेळी तो उघडपणे लोकांमध्ये मिसळला होता. काबुलच्या रस्त्यांवर नारा-ए-तकबीर लावत तो लोकांना उकसावत होता. काबुलमध्ये जिहादी मुजाहिदीनचा नेता गुलबुद्दीन हिकमतयारची देखील त्याने भेट घेतली. अमेरिकेने खलील हक्कानीला 9 फेब्रुवारी 2011 ला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. अमेरिका अफगानिस्तान सोडून गेली असली तरी काही सैन्य काबुल विमानतळावर मागे राहिले आहे. खलील खुलेआम फिरत असूनही अमेरिका त्याला अटक करू शकत नाही. यावरून अमेरिकी सैन्य किती लाचार झालेय याचे हे उदाहरण म्हणून जग पाहत आहे. 

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

यावेळी खलीलच्या सुरक्षेला तालिबानची बद्री बटालियन होती. अमेरिकेचा गणवेश, हेल्मेट, नाईट व्हिजन चष्मा आणि अन्य आयुधे दिसली. स्वत: खलीलच्या हातात अमेरिकीचे अद्ययावत असॉल्ट रायफल होती. त्याच्या सुरक्षेतील कमांडो लोकांची गर्दी बाजुला करून त्याला रस्ता करून देत होते. खलीलने अल कायदासाठी देखील काम केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी देखील त्याला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित केले आहे. 

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

खलील म्हणाला की, तालिबानची संरक्षण हिच प्राथमिकता असेल. कारण संरक्षण नसेल तर आयुष्य असणार नाही. तालिबानच देशाची सुरक्षा केल. यानंतर अर्थव्यवस्था, उद्योग, शिक्षणाकडे लक्ष दिले जाईल. कोणासोबत भेदभाव होणार नाही. पत्रकार आणि महिलांना घाबरण्याची आवश्यकता नाही. 

Afghanistan Crisis: हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले

Web Title: Afghanistan crisis: Khalil Haqqani takes charge of Kabul; American army only watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.