Afghanistan Crisis: जो बायडेन आणि अश्रफ घानी यांच्यातील अखेरचे संभाषण आले समोर, १४ मिनिटांच्या चर्चेत झाले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:23 PM2021-09-01T13:23:10+5:302021-09-01T13:23:33+5:30

Afghanistan Crisis Update: अश्रफ घानी सरकार कोसळण्याआधी जो बायडन आणि अश्रफ घानी यांच्यात झालेल्या अखेरच्या संभाषणाबाबतची माहिती समोर आली आहे. तसेच १४ मिनिटे चाललेल्या या चर्चेमधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत.

Afghanistan Crisis: The last conversation between Joe Biden and Ashraf Ghani came to light. | Afghanistan Crisis: जो बायडेन आणि अश्रफ घानी यांच्यातील अखेरचे संभाषण आले समोर, १४ मिनिटांच्या चर्चेत झाले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट 

Afghanistan Crisis: जो बायडेन आणि अश्रफ घानी यांच्यातील अखेरचे संभाषण आले समोर, १४ मिनिटांच्या चर्चेत झाले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट 

Next

वॉशिंग्टन - गेली २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून असलेले अमेरिकेचे सैन्य परवा माघारी परतले. त्याबरोबरच दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धाची समाप्ती झाली. (Afghanistan Crisis) मात्र अमेरिकेने अफगाणिस्तानमधून पूर्णपणे माघार घेण्यापूर्वीच तालिबानने देशातील अश्रफ घानी सरकार उलथवून अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केला होता. दरम्यान, अश्रफ घानी सरकार कोसळण्याआधी जो बायडन आणि अश्रफ घानी यांच्यात झालेल्या अखेरच्या संभाषणाबाबतची माहिती समोर आली आहे. तसेच १४ मिनिटे चाललेल्या या चर्चेमधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत. (The last conversation between Joe Biden and Ashraf Ghani came to light) 

अश्रफ घानी आणि जो बायडन यांच्यात १४ मिनिटे चाललेल्या चर्चेमध्ये लष्करी मदत आणि राजकीय रणनीतीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांमध्ये तालिबानकडून अफगाणिस्तावर होणाऱ्या कब्ज्यााबाबत चर्चा झाली नाही. सूत्रांनी ओळख न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या ट्रान्स्क्रिप्टचे परीक्षण करून रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या संभाषणामध्ये बायडन यांनी जर घनी यांनी तालिबानविरोधात हल्ल्याची काही योजना आखली तर अमेरिका त्याला सहकार्य करेल, असे सांगितले होते.  
तसेच अफगाणिस्तानची लष्करी रणनीती तयार करा. तसेच या योजनेचे वॉरियर तत्कालीन संरक्षणमंत्री जनरल बिस्मिल्ला खान मुहम्मदी यांना बनवा, असा सल्ला बायडन यांनी घानी यांना दिला होता. तसेच मी लष्करासी संबंधित व्यक्ती नाही. त्यामुळे मी तुम्हाला लष्करी रणनीतीबाबत सल्ला देऊ शकत नाही, असेही बायडन म्हणाले होते. त्याबरोबरच तालिबानकडून अफगाणिस्तानमधील एकेका जिल्ह्यावर होत असलेल्या कब्जाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील राजकारण्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका जगासमोर मांडावी, असा सल्लाही बायडन यांनी दिला होता. 
बायडेन यांनी अफगाणी सैन्याचेही कौतुक केले होते. तुमच्याकडे खूप चांगले ३ लाख सैन्य आहे. ते तालिबानच्या ७० ते ८० हजार योद्ध्यांशी लढण्यामध्ये सक्षम आहे, असे ते म्हणाले होते. तर अश्रफ घानी यांनी बायडन यांना सांगितले होते की, आमच्यावर तालिबानच हल्ला करत नाही आहे, तर पाकिस्तानही पूर्ण योजनेसह आमच्यावर आक्रमण करत आहे. त्यांनी १० ते १५ हजार दहशतवादी येथे पाठवले आहेत. जेव्हा लष्करी स्थिती संतुलित असेल तेव्हाच आम्ही शांतता प्रस्थापित करू. यावेळी बायडन यांनी घानी यांना माजी राष्ट्रपती हमिद करझई यांना सोबत घेण्याचा सल्ला दिला. मात्र घानी याबाबत म्हणाले की, त्यांनी तसे प्रयत्न केले आहेत. मात्र करझई मला अमेरिकेचा नोकर म्हणून टीका करतात, अशी तक्रार घानी यांनी केली होती. 

Web Title: Afghanistan Crisis: The last conversation between Joe Biden and Ashraf Ghani came to light.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.