Afghanistan crisis : 'उमेद' उरलीच नाही... अफगाण स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत तळतोय फ्रेंज फ्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 04:51 PM2021-08-17T16:51:37+5:302021-08-17T17:01:01+5:30

Afghanistan crisis : कधीकाळी स्पेशल फोर्समध्ये बंदुक घेऊन देशाचं रक्षण करणारा हा जवान आज दिल्लीतील लाजपत नगर येथे फ्रेंच फ्राईज तळून उदरनिर्वाह करत आहे. आज दिवसाला 300 रुपये मिळतात, पण उद्याचं काहीचं माहिती नाही.

Afghanistan crisis : No 'hope' left ... Afghan Special Forces jawan frying fries in Delhi lajpat nagar | Afghanistan crisis : 'उमेद' उरलीच नाही... अफगाण स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत तळतोय फ्रेंज फ्राईज

Afghanistan crisis : 'उमेद' उरलीच नाही... अफगाण स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत तळतोय फ्रेंज फ्राईज

Next
ठळक मुद्देकधीकाळी स्पेशल फोर्समध्ये बंदुक घेऊन देशाचं रक्षण करणारा हा जवान आज दिल्लीतील लाजपत नगर येथे फ्रेंच फ्राईज तळून उदरनिर्वाह करत आहे. आज दिवसाला 300 रुपये मिळतात, पण उद्याचं काहीचं माहिती नाही.

काबुल - अफगाणिस्तानमधील सत्ता बदलानंतर जगभर तालिबानच्या हुकूमशाहीची चर्चा रंगली आहे. तालिबानने रविवारी काबुलमधील राजधानीवर कब्जा केला. तत्पूर्वी, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून निघून गेले आहेत. राष्ट्रपतींनीच देश सोडल्यामुळे तेथील नागरिक भयभीत झाले असून अफगाणिस्तान सोडून विदेशात जाण्यासाठी त्यांची धडपड दिसत आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या सैन्याने तालिबानसमोर हात टेकले आहेत. काबुल सोडून भारतात आलेल्या अफगाणिस्तान स्पेशल फोर्सच्या एका जवानाने दु:खभरी आपबिती सांगितली आहे.

उमेद नाव असलेल्या अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्समधील जवानाने 5 महिन्यांपूर्वीच देश सोडू दिल्ली गाठलं. मात्र, दिल्लीत उदरनिर्वाह करणं आता जिकरीचं बनलं आहे. कधीकाळी स्पेशल फोर्समध्ये बंदुक घेऊन देशाचं रक्षण करणारा हा जवान आज दिल्लीतील लाजपत नगर येथे फ्रेंच फ्राईज तळून उदरनिर्वाह करत आहे. आज दिवसाला 300 रुपये मिळतात, पण उद्याचं काहीचं माहिती नाही. कारण, रिफ्यूजी कार्डवर सध्या दिल्लीत वास्तव्यास असल्याचं उमेदनं सांगितलं. हळूहळू थोडी हिंदी शिकण्याचा प्रयत्न तो करत आहे. 

उमेदचे आई-वडिल लहानपणीच एका अपघात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले. तर, सैन्यातील त्यांच्या मित्रांना, सहकाऱ्यांना तालिबान्यांनी ठार केलंय. त्यामुळे, आपलं म्हणावं असं आता कोणीच उरलं नाही. जगण्यासाठीचा संघर्ष सध्या दिल्लीत सुरू आहे. अफगाणिस्तानमधील आजची परिस्थिती ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर उमेदला भूतकाळातील सैन्यातील दिवस आठवले. तालिबान्यांशी लढलो, अनेकांना ठार केले. त्यामुळेच आज त्यांच्या ब्लॅक लिस्टमध्ये आहे. आता, अफगाणिस्तानला गेलो तर ते ठार मारतील, असेही उमेदने म्हटले. उमेदने भूतकाळातील काही व्हिडिओही येथील सहकाऱ्यांना दाखवले. 

मी तेथून पळून आलो नसतो तर दोनच पर्याय माझ्याकडे होते. एकतर मरावं लागलं असतं किंवा त्यांच्या तालिबानी गटात सामिल व्हाव लागलं असतं. सरकारने काहीच केलं नाही. पॉलिटीक्स आणि टेररिजम दोन्हीही खतरनाक आहे. आपल्या लोकांना मरताना पाहणे हेही मरण्यासारखंच आहे, असे म्हणत उमेदने आपली दु:खी कहानी सांगितली. उमेद सध्या लाजपत नगरमधील एका स्ट्रीट फूडच्या स्टॉलवर फ्रेंज फ्राईज तळण्याचं काम करुन आपलं जीवन जगत आहे. भारत चांगला देश आहे, पण एका अफगाणी नागरिकांसाठी अडचणी आहेत. सध्या युनिसेफचं कार्ड आहे, यापुढे राहण्यासाठी अनेक प्रकिया कराव्या लागतील, असेही त्याने म्हटले. 
 

Web Title: Afghanistan crisis : No 'hope' left ... Afghan Special Forces jawan frying fries in Delhi lajpat nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.