Afghanistan Crisis: याला म्हणतात हिंमत! अफगाणिस्तानाचा मजबूत बालेकिल्ला; इथे घुसायला तालिबानही घाबरतो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 01:15 PM2021-08-19T13:15:05+5:302021-08-19T13:15:40+5:30

Afghanistan Crisis: मरण चालेल, पण शरण जाणार नाही; पंजशीर प्रांत तालिबान्यांशी लढण्यास सज्ज

Afghanistan Crisis panjshir lone afghanistan province which will lead the fight against taliban | Afghanistan Crisis: याला म्हणतात हिंमत! अफगाणिस्तानाचा मजबूत बालेकिल्ला; इथे घुसायला तालिबानही घाबरतो

Afghanistan Crisis: याला म्हणतात हिंमत! अफगाणिस्तानाचा मजबूत बालेकिल्ला; इथे घुसायला तालिबानही घाबरतो

googlenewsNext

काबुल: अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आली. तालिबानी दहशतवाद्यांच्या भीतीनं संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. मिळेल त्या वाटेनं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अफगाणिस्तानातला एक प्रांत अद्यापही तालिबान्यांना शरण गेलेला नाही. पंजशीर खोरं तालिबानला अद्यापही जिंकता आलेलं नाही. नॉर्दन अलायन्सचा बालेकिल्ला असलेला पंजशीर प्रांत अजूनही मोकळा श्वास घेत आहे.

अफगाणिस्तानात एकूण ३४ प्रांत आहेत. यातला केवळ एक प्रांत तालिबान्यांच्या ताब्यात नाहीत. तो म्हणजे पंजशीर. ७० आणि ८० च्या दशकात सोव्हियत रशियानं पंजशीर प्रांत जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. पंजशीरचा अर्थ पाच सिंहांचं खोरं असा होतो. काबूलपासून १५० किलोमीटर अंतरावर हा प्रांत आहे. याच खोऱ्यातून पंजशीर नदी वाहते. हिंदुकुश डोंगर या भागापासून जवळ आहे. 

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करताच राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला. मात्र उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी देश सोडलेला नाही. ते पंजशीरमध्ये आहेत. त्यांच्यासोबत पंजशीरचे अहमद मसूददेखील आहेत. पंजशीरचे शेर अशी ओळख असलेल्या अहमद शाह मसूद यांचे ते पुत्र आहेत. अहमद शाह मसूद यांनीच नॉर्दन अलायन्सची पायाभरणी केली. त्यांचे पाश्चिमात्य देशांशी उत्तम संबंध होते. 

तालिबानचा मुकाबला करू. पण शरण जाणार नाही. गुडघे टाकणार नाही. पंजशीरची जनता दहशतवाद्यांपुढे झुकणार नाही. आम्ही मरण पत्करू. पण वाकणार नाही, असा आक्रमक पवित्रा इथल्या नागरिकांनी घेतला आहे. तालिबान पंजशीरवर थेट आक्रमण करणार नाही. आधी चोहोबाजूंनी वेढा देऊन खाद्यपुरवठा, रसद तोडली जाईल, असा इथल्या नागरिकांचा कयास आहे. त्यामुळेच नॉर्दन अलायन्स बऱ्याच महिन्यांचा खाद्यसाठा ठेवला आहे. तालिबानशी संघर्ष करण्याची पूर्ण तयारी पंजशीर प्रांतानं केली आहे.

Web Title: Afghanistan Crisis panjshir lone afghanistan province which will lead the fight against taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.