Afghanistan Crisis: बॅटऐवजी AK-47, बॉलऐवजी बॉम्ब! तालिबानची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसखोरी, या क्रिकेटपटूने दिली साथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 09:32 AM2021-08-20T09:32:07+5:302021-08-20T09:49:20+5:30

Afghanistan Crisis Update: जागतिक क्रिकेटमध्ये अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण करत असलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघांवरही तालिबानची वक्रदृष्टी पडली असून, तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयामध्येही घुसखोरी केली आहे.

Afghanistan Crisis: Taliban infiltrated the Afghanistan Cricket Board (ACB) office | Afghanistan Crisis: बॅटऐवजी AK-47, बॉलऐवजी बॉम्ब! तालिबानची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसखोरी, या क्रिकेटपटूने दिली साथ 

Afghanistan Crisis: बॅटऐवजी AK-47, बॉलऐवजी बॉम्ब! तालिबानची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसखोरी, या क्रिकेटपटूने दिली साथ 

Next

Aकाबुल - अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आता तालिबानने देशातील विविध संस्थांवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. (Afghanistan Crisis) सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण करत असलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघांवरही तालिबानची वक्रदृष्टी पडली असून, तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयामध्येही घुसखोरी केली आहे. (Afghanistan Cricket Board) सोशल मीडियावर याबाबतचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. यामध्ये तालिबानचे दहशतवादी AK-47 घेऊन अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या ऑफीसमध्ये घुसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत माजी फिरकीपटू अब्दुल्लाह मजारी हासुद्धा दिसत आहे. (Taliban infiltrated the Afghanistan Cricket Board (ACB) office)

अब्दुल्ला मजारी हा डावखुरा फिरकीपटू असून, त्याने दोन एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याशिवाय २१ प्रथमश्रेणी, १६ लिस्ट ए आणि १३ टी-२० सामनेही तो खेळला आहे. अब्दुल्लाह मजारीने काबुल ईगल्स संघाकडून शपागीजा टी-२० लीग स्पर्धेतही सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू रशिद खान हासुद्धा अब्दुल्ला मजारीसोबत काबुल ईगल्स संघाकडून खेळला होता. 

दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर अफगाणिस्तानमधील क्रिकेटचे भविष्यही अंधकारमय झाले आहे. अफगाणिस्तानने अल्पावधीत जागतिक क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. मात्र मात्र आता तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणी क्रिकेटचं काय होईल, याबाबत कुणीही निश्चितपणे काही सांगू शकत नाही.

मात्र अफगाण क्रिकेट बोर्डाचे सीईओ हामिद शेनवारी यांनी तालिबानपासून अफगाणी क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांना कुठलाही धोका नसल्याचा दावा केला आहे. तालिबानला क्रिकेट आवडते. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होईल. एवढेच नाही तर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड १० ते २५ सप्टेंबरदरम्यान, शपागिजा क्रिकेट लीगचे आयोजन करणार आहे, असा दावाही शेनवारी यांनी केला होता.

मात्र तालिबानच्या महिलांबाबतच्या धोरणामुळे अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट संकटात सापडले आहे. अफगाण क्रिकेट मंडळाने २५ महिला क्रिकेटपटूंसोबत मध्यवर्ती करार केला होता. मात्र आता महिला क्रिकेट संघ न राहिल्यास अफगाणिस्तानला आयसीसीचा पूर्ण सदस्य देश राहता येणार नाही.  

Web Title: Afghanistan Crisis: Taliban infiltrated the Afghanistan Cricket Board (ACB) office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.