Afghanistan Crisis: तालिबानी दहशतवाद्यांनी जाहीरपणे उडवली अमेरिकन सैनिकांची खिल्ली, फोटो झाले व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 03:44 PM2021-08-22T15:44:31+5:302021-08-22T15:45:50+5:30

Afghanistan Crisis: तालिबानच्या बद्री ३१३ बटालियनने एक प्रोपगेंडा फुटेज जारी केले आहे. ज्यामधील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोच्या माध्यमातून तालिबानने अमेरिकन सैनिकांची खिल्ली उडवली आहे.

Afghanistan Crisis: Taliban militants openly mock US troops, photo goes viral | Afghanistan Crisis: तालिबानी दहशतवाद्यांनी जाहीरपणे उडवली अमेरिकन सैनिकांची खिल्ली, फोटो झाले व्हायरल 

Afghanistan Crisis: तालिबानी दहशतवाद्यांनी जाहीरपणे उडवली अमेरिकन सैनिकांची खिल्ली, फोटो झाले व्हायरल 

googlenewsNext

काबुल - आठ दिवसांपूर्वी काबुलवर कब्जा करत अफगाणिस्तानची सत्तासूत्रे ताब्यात घेणाऱ्या तालिबानचे रागरंग आठवडाभरात संपूर्ण जगाने पाहिले आहेत. तालिबानची सत्ता येताच अफगाणिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात तालिबानने नव्याने उभ्या केलेल्या बद्री ३१३ बटालियनची दहशत अधिकच निर्माण झाली आहे. दरम्यान, या बद्री ३१३ बटालियनने एक प्रोपगेंडा फुटेज जारी केले आहे. ज्यामधील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोच्या माध्यमातून तालिबानने अमेरिकन सैनिकांची खिल्ली उडवली आहे. (Taliban militants openly mock US troops, photo goes viral)

या फोटोमध्ये तालिबानी दहशतवादी इवो जिमा येथे दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन सैनिकांनी अमेरिकन ध्वज ज्या प्रकारे उचलला होता त्याची नक्कल करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवादी हे नेहमी पारंपरिक अफगाण वेशात असतात. मात्र बद्री बटालियनमधील दहशतावादी हे अत्याधुनिक वेशात दिसत आहेत.

डेली मेल या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानी योद्धे अमेरिकन रायफल बुलेट प्रुफ जॅकेट आणि नाईट व्हिजन गॉगल्स परिधान करून तालिबानचा झेंडा उचलताना दिसत आहेत. तालिबानीं दहशतवादी अमेरिकन रायफल, बुलेटप्रुफ जॅकेट आणि नाईट व्हिजन गॉगल्स परिधान करून तालिबानचा झेंडा उचलताना दिसत आहेत. तालिबानींचा हा फोटो अगदी त्या फोटोप्रमाणे आहे ज्यामध्ये १९४५ च्या इवो जीमा ल़ढाईमध्ये अमेरिकन सैनिक सुरिबाची पर्वतावर ध्वज फटकावताना दिसतात.

एकीकडे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी का बोलावले असा प्रश्न जगभरातून विचारला जात असतानाच तालिबानच्या बद्री बटालियनने अमेरिकेची अशा प्रकारे खिल्ली उडवली आहे. मात्र अशी टीका होत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी समोर येत आम्ही अपयशी ठरलो नाही तर अफगाणिस्तानचं नेतृत्व आणि सैन्याने हात वर केले, असा युक्तिवाद केला आहे.

बद्री ३१३ बटालियन ही तालिबानी योद्ध्यांचे एक विशेष पथक आहे. या पथकामधील सैनिक हे अगदी अमेरिकन मरीन कमांडोंप्रमाणे आहेत. ते अत्याधुनिक घातक अशा अमेरिकी एम४ रायफल, बॉडी आर्मर, नाईट व्हिजन गॉगल्स, बुलेट प्रुफ जॅकेट आणि हत्यारबंद बुलेटप्रूफ गाड्या चालवतात. या बटालियनकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये बद्री ३१३ बटालियनचे जवान हे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह गणवेशात दिसत आहेत. तर इरत अफगाणी दहशतवादी हे सलवार कमीज आणि एके-४७ खांद्यावर लटकवलेल्या स्थितीत दिसतात. 

Web Title: Afghanistan Crisis: Taliban militants openly mock US troops, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.