Afghanistan Crisis: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:22 AM2021-09-01T10:22:53+5:302021-09-01T10:23:46+5:30

Afghanistan Crisis Update: तालिबानकडून आफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच लवकरच नव्या सरकारची स्थापना केली जाणार आहे.

Afghanistan Crisis: Taliban prepares to form government, Mullah Baradar names in front for president post | Afghanistan Crisis: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर

Afghanistan Crisis: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर

Next

काबुल - अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर आता तालिबानने नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी केली आहे. तालिबानने मंगळवारी अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. तसेच आनंदोत्सव साजरा केला. आता आफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच लवकरच नव्या सरकारची स्थापना केली जाणार आहे. (Taliban prepares to form government, Mullah Baradar names in front for president post)

मिळालेल्या माहितीनुसार तालिबानचा नेता मुल्ला बरादर लवकरच काबुलमध्ये दाखल होणार आहे. तसेच मुल्ला बरादरचे नावच अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर आहे. तालिबानचे नवे सरकार काही दिवसांवर आहे, असे विधान तालिबानचा नेता अनस हक्कानी याने केले होते. हल्लीच कंधारमध्ये तालिबानच्या ज्येष्ठ नेत्यांनी सरकारच्या स्थापनेबाबत दीर्घ चर्चा केली होती. कतारची राजधानी दोहा येथून आल्यानंतर तालिबानचे वरिष्ठ नेते कंधारमध्ये थांबलेले आहेत. यामध्ये तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याचाही समावेश आहे.

मात्र तालिबानच्या नव्या सरकारची रचना कशी असेल. कोण राष्ट्रपती असेल आणि कुणाला कुठली जबाबदारी दिली जाईल, हे अद्याप ठरलेले नाही. सरकार स्थापन झाल्यानंतरच या बाबी स्पष्ट केल्या जातील, असे तालिबानच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ३१ ऑगस्ट २०२१ ही परदेशी सैन्यांना माघारी परतण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत होती. मात्र अमेरिकेसह इतर अनेक देशांच्या सैन्याने ३० ऑगस्ट रोजीच काबुलमधून काढता पाय घेतला होता. त्यानंतर लगेचच तालिबानच्या योध्यांनी काबुल विमानतळावर कब्जा केला होता. तसेच अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सोडलेल्या हत्यारांचाही आढावा घेतला होता.

एकीकडे तालिबानने सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू केली असताना दुसरीकडे भारतानेही अधिकृतपणे तालिबानसोबत चर्चेस सुरुवात केली आहे. अमेरिकन सैन्याने अपगाणिस्तानमधून पूर्णपणे माधार घेतल्यानंतर भारताने ही चर्चा सुरू केली आहे. 
 

Web Title: Afghanistan Crisis: Taliban prepares to form government, Mullah Baradar names in front for president post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.