Afghanistan Crisis: तालिबानने अमेरिकेला दिली मोठी धमकी, "३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी न बोलावल्यास...’’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 02:43 PM2021-08-23T14:43:04+5:302021-08-23T14:43:13+5:30

Afghanistan Crisis: बचाव मोहीम अद्याप सुरू असल्याने अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबुल विमानतळावर तैनात आहेत. यादरम्यान तालिबानने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे.

Afghanistan Crisis: Taliban threatens US with "serious consequences if troops do not withdraw by August 31" | Afghanistan Crisis: तालिबानने अमेरिकेला दिली मोठी धमकी, "३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी न बोलावल्यास...’’

Afghanistan Crisis: तालिबानने अमेरिकेला दिली मोठी धमकी, "३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी न बोलावल्यास...’’

googlenewsNext

काबुल - तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथून लोकांचे पलायन सातत्याने सुरू आहे. अमेरिका आणि अन्य नाटो देशांच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून जवळपास काढता पाय घेतला आहे. (Afghanistan Crisis) मात्र बचाव मोहीम अद्याप सुरू असल्याने अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबुल विमानतळावर तैनात आहेत. यादरम्यान तालिबानने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. (Taliban threatens US with "serious consequences if troops do not withdraw by August 31")

तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहीनने सोमवारी कतारमध्ये सांगितले की, जर अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलावण्यात उशीर केला तर त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील. अमेरिकन सैनिकांच्या माघारीसाठी ३१ ऑगस्ट हीच डेडलाईन तालिबानकडून घोषित करण्यात आली आहे. एकीकडे तालिबानने जगातील अनेक देशांना त्यांच्या काबुलमधील वकिलाती सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यासाठी सुरक्षा देण्याचीही घोषणा केली आहे. मात्र दुसरीकडे तालिबानने अमेरिकेला मात्र निर्धारित केलेल्या डेडलाईनमध्येच अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे.

३१ ऑगस्टपर्यंत रेस्क्यू मिशन पूर्ण करून आपल्या सैनिकांना माघारी बोलावू, असे अमेरिकेने आधी सांगितले होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जर मोहीम पूर्ण झाली नाही तर अमेरिकन सैनिक ३१ ऑगस्टनंतरही अफगाणिस्तानमध्ये राहू शकतात, असे संकेत दिले होते.

तत्पूर्वी ११ सप्टेंबरच्या आत अफगाणिस्तान सोडण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. अमेरिकन सैन्य माघारी परतण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. मात्र आताही सुमारे ५ हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक काबुल विमानतळावर उपस्थित आहेत. तसेच बचाव मोहिमेला तडीस नेत आहे. त्याशिवाय नाटो देशांचे सैनिकही येथून आपापल्या देशांच्या नागरिकांना बाहेर काढत आहे. 

Web Title: Afghanistan Crisis: Taliban threatens US with "serious consequences if troops do not withdraw by August 31"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.