Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:55 AM2021-08-18T05:55:16+5:302021-08-18T05:56:00+5:30

Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते.

Afghanistan Crisis: Two hundred Indian ‘airlifts’, freed from the clutches of the Taliban; The organization says we will keep all foreign nationals safe | Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू

Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू

Next

नवी दिल्ली : तालिबानने ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे काबूलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास भारताने सुरुवात केली आहे. भारतीय वायुसेनेची दोन विमाने २०० भारतीयांना घेऊन मायदेशी परत आली. ही विमाने गुजरातच्या जामनगर येथे दाखल झाली. त्यात भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. काबूलचे विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियाने काबूलहून विशेष उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू असताना तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने अडचण निर्माण झाली होती.

तोवर सेवा सुरूच राहणार
भारताने अफगाणिस्तानातून राजदूतांसह दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. 
परिणामी १९९६ नंतर पुन्हा एकदा तेथील दूतावास बंद झाला आहे. मात्र, अद्यापही काही भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी एअर इंड‍ियाने विशेष विमाने उडविण्याचा निर्णय घेतला आहे. 
काबूल येथील विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियातर्फे विशेष विमाने उडविणार असल्याची माहिती रुद्रेंद्र टंडन यांनी दिली.

पासपोर्टअभावी अनेक कामगार अडकले
उत्तर प्रदेशातील काही कामगार काबूलमधील एका कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. त्यांचे पासपोर्ट कंपनीच्या मालकाने ताब्यात घेतल्याचे या कामगारांनी सांगितले असून, आपल्याला लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची विनंती या कामगारांनी केली. 

भारतीयांना असे काढले बाहेर
काबूलचे विमानतळ अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे. त्यांनी विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात 
आणल्यानंतर विमान वाहतूक सुरू झाली. 
त्यानंतर अखेर वायुसेनेची दोन ‘सी-१७’ विमाने मंगळवारी सकाळी काबूलमध्ये दाखल झाली. 
दूतावासातील कर्मचारी, सुरक्षा जवान, तसेच काही पत्रकारांना घेऊन हे विमान मायदेशी परतले. 
तालिबानने ठिकठिकाणी चेकपॉइंट उभारले आहेत. त्यामुळे भारतीयांना दूतावासातून विमानतळापर्यंतचे अवघे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यात मोठे अडथळे आल्याची माहिती टंडन यांनी दिली.

प्रथमच उपराष्ट्रपती सालेह यांनी तालिबानविरोधात थोपटले दंड
तालिबानपुढे शरणागती पत्करून राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केले असतानाच प्रथमच उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. राज्यघटनेचा आधार देऊन त्यांनी ही घोषणा केली. कोणत्याही स्थितीत तालिबान्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केली. तालिबानला फार प्रतिकाराविना जवळपास सर्व प्रांत काबीज करता आले. काबूलमध्येही त्यांना सहज प्रवेश मिळाला. मात्र, सालेह यांच्या भूमिकेमुळे नव्याने सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

Web Title: Afghanistan Crisis: Two hundred Indian ‘airlifts’, freed from the clutches of the Taliban; The organization says we will keep all foreign nationals safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.