Afghanistan Taliban: पंजशीरच्या वाघाची डरकाळी! अमरुल्ला सालेहच्या एका ट्विटनं तालिबानी घाबरले, इंटरनेट केलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 04:19 PM2021-08-29T16:19:24+5:302021-08-29T16:20:43+5:30
Afghanistan Taliban: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) कब्जा मिळवून आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. पण अजूनही अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांत काही तालिबान्यांना काबीज करता आलेला नाही.
Afghanistan Taliban: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) कब्जा मिळवून आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. पण अजूनही अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांत काही तालिबान्यांना काबीज करता आलेला नाही. यातच तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा देखील बंद केली आहे.
“कुठल्याही किंमतीत झुकणार नाही”; पंजशीरमधल्या वाघाची तालिबानींविरोधात डरकाळी
अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला साहेल यांनी तालिबान्यांविरोधात सुरुवातीपासूनच आव्हान दिलं आहे. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर सालेह यांनी मात्र तालिबान्यांना आव्हान देत स्वत:ला देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषीत केलं. त्यानंतर तालिबान्यांविरोधातील संघर्ष कायम ठेवत पंजशीर प्रांत काही तालिबान्यांच्या हातात जाऊ दिलेला नाही. यातच तालिबाननं आता पंजशीर प्रांतातील इंटरनेटवर बंदी घातली आहे. अमरुल्ला सालेह कोणतंही ट्विट करु नयेत यासाठीच तालिबाननं ही खेळी केल्याचं बोललं जात आहे.
अमरुल्ला सालेह ट्विटरवर चांगलेच सक्रीय असून ते अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर आणि तालिबान्यांविरोधात ट्विट करणं सुरूच ठेवलं आहे. त्यांनी शनिवारी देखील असंच एक ट्विट केलं होतं. सालेह यांनी Resistance अशा एका शब्दात ट्विट केलं होतं.
RESISTANCE
— Amrullah Saleh (@AmrullahSaleh2) August 27, 2021
مقاومت
पंजशीर अफगाणिस्तानातील एकमेव असा प्रांत आहे की जिथं तालिबान्यांना कब्जा करता आलेला नाही. तालिबानला विरोध करणारे सर्वजण पंजशीरमध्ये लढा देत आहेत. यात अफगाणी कमांडर अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबान्यांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे.
तालिबानने गुडघे टेकले! पंजशीरमध्ये घुसणार नाही; अहमद मसूदसोबत शस्त्रसंधीवर चर्चा
पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी देखील पाठविले. परंतू, एकाच झटक्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांना पंजशीरच्या लढवय्यांनी मारले. यामुळे तालिबान आता नमला आहे. तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. दोन्ही गटांमध्ये जोरदार लढाई सुरु होती. मात्र, तालिबानने सीझफायर करार करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजशीरचा नेता अहमद मसूरने तालिबानला लढण्याची इच्छा नाही, परंतू जबरदस्ती केली तर युद्ध करण्याचा इशारा दिला होता. तरीही तालिबानने तिकडे ताकद पाठविली होती. पंजशीर काही ताब्यात येत नाही, हे पाहून तालिबानने अहमदच्या नेतृत्वातील नॉर्दन अलायन्ससोबत चर्चा सुरु केली आहे. तालिबानकडून मौलाना अमीर खान मुक्तई चर्चा करत आहे. तालिबानने या चर्चेला अमन जिरगा असे नाव दिले आहे. ही बैठक परवान जिल्ह्यातील चारिकर भागात होत आहे.