Afghanistan Crisis: तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड; संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 07:57 AM2021-08-18T07:57:49+5:302021-08-18T10:04:55+5:30

अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकल्यानं दहशतवाद्यांच्या हाती लागलं मोठं घबाड

afghanistan crisis us weapons worth millions of dollars in the hands of taliban white house expressed concern | Afghanistan Crisis: तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड; संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ

Afghanistan Crisis: तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड; संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ

Next

वॉशिंग्टन: अफगाणिस्तानात दोन दशकांनंतर पुन्हा तालिबानची राजवट आली आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी परतल्यानंतर तालिबाननं डोकं वर काढण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच तालिबाननं अफगाणिस्तानच्या बऱ्याचशा प्रांतात मुसंडी मारली. राजधानी काबुलवर कब्जा करत तालिबाननं संपूर्ण देशच आपल्या अंमलाखाली आणला. आता त्यांच्या हाती अमेरिकेची अनेक अत्याधुनिक उपकरणं लागली आहेत. व्हाईट हाऊसनं मंगळवारी याबद्दलची माहिती दिली. गेल्या रविवारीच तालिबाननं विजयाची घोषणा केली आहे.

अमेरिकन सैन्याच्या उपकरणांचा एक मोठा हिस्सा तालिबानकडे गेला असल्याची माहिती काल व्हाईट हाऊसनं दिली. या संदर्भातले काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यात तालिबानचे दहशतवादी अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर करताना दिसत आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या हातात दिसणारी शस्त्रास्त्रं आता तालिबान्यांच्या हातात दिसू लागली आहेत. ही शस्त्रं अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना दिली होती. यात यूएस-६० ब्लॅक हॉक आणि कंदहार विमानतळावरील उपकरणांचा समावेश आहे.

संरक्षण साहित्यामधील सर्व उपकरणं कुठे गेली, याबद्दलची संपूर्ण माहिती आमच्याकडे नाही. मात्र त्या सामग्रीचा बराचसा हिस्सा तालिबान्यांच्या हाती गेला आहे, असं व्हाईट हाऊसच्या सुरक्षा सल्लागारांनी सांगितलं. तालिबान्यांचा सामना करण्यासाठी अमेरिकेकडून ब्लॅक हॉक्स अफगाणिस्तान सरकारला देण्यात आले होते. मात्र सरकारनं तालिबान्यांसमोर गुडघे टेकले. सुरक्षा दलांनी शस्त्र, उपकरणं, हेलिकॉप्टर्सवरील नियंत्रण सोडून दिलं. त्यामुळे बरीचशी अत्याधुनिक शस्त्रं आणि उपकरणं तालिबान्यांच्या ताब्यात गेली, अशी माहिती सुरक्षा सल्लागारांनी दिली.

 

Web Title: afghanistan crisis us weapons worth millions of dollars in the hands of taliban white house expressed concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.