Afghanistan Crisis : तालिबानींना पैसा येतो कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 06:13 AM2021-08-19T06:13:31+5:302021-08-19T06:13:58+5:30

Afghanistan Crisis : २० वर्षांमध्ये आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा तालिबानींकडे कुठून आला. काय आहे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत?

Afghanistan Crisis: Where does the Taliban get its money from? | Afghanistan Crisis : तालिबानींना पैसा येतो कुठून?

Afghanistan Crisis : तालिबानींना पैसा येतो कुठून?

Next

साधारणत: दोन दशकांपूर्वी तालिबानींनाअफगाणिस्तानातून सत्ताच्युत करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पाच-सहा वर्षे अफगाणिस्तानवर सत्ता गाजवली. आताही त्यांनी सत्ता काबीज केली आहे. परंतु या २० वर्षांमध्ये आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा तालिबानींकडे कुठून आला. काय आहे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत?

अफू हेच मोठे उत्पन्नाचे स्रोत
- ८०%अफूचे उत्पादन जगात एकट्या अफगाणिस्तानात होते. 
- जगभरात कोरोना जेव्हा थैमान घालत होता त्यावेळीही अफगाणिस्तानातील अफूच्या उत्पादनात ३७ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली. 
- अफूच्या तस्करीतून ४९ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. 
- अफूची शेती करणारे शेतकरी आणि व्यापार करणारे व्यापारी यांच्यावर तालिबानची दहशत आहे. त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा वाटा ते तालिबानींना बिनबोभाटपणे देतात. 

तालिबानींची दहशत
- अफूच्या शेतीवर पूर्णत: तालिबान्यांचे वर्चस्व आहे.
- तालिबानी अफूच्या व्यापारावर कर आकारतात. 
- या कर आकारणीतून तालिबानींना सरासरी ३,००० कोटी रुपये प्राप्त होतात. 

तालिबानचे उत्पन्नाचे इतर स्रोत
- अफगाणिस्तानला लागून ज्या देशांच्या सीमा आहेत तेथील चौक्यांवर तालिबानींनी आपले प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. 
- तालिबानचे हे प्रतिनिधी या चौक्यांवरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवतात व जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक मालवाहतूकदाराकडून जबरी कर वसूल करतात.
- ज्या शहरावर वा लष्करी तळावर तालिबान कब्जा करतात तेव्हा तेथील सर्व संपत्ती तालिबानी लुटतात.

- अफगाणिस्तानात अवैध उत्खनन करणाऱ्या कंपन्यांकडूनही तालिबान करवसुली करतात. या सर्व कारवायांतून तालिबानला प्रचंड आर्थिक उत्पन्न मिळत असते. 

Web Title: Afghanistan Crisis: Where does the Taliban get its money from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.