Afghanistan Crisis: तालिबानी आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 06:02 AM2021-08-18T06:02:17+5:302021-08-18T06:02:46+5:30

Afghanistan Crisis: सत्तेत आल्यानंतर शरियतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षा पुरवू याची हमी त्या काळात तालिबानी देत होते. मात्र, त्या नावाखाली लुटमार आणि महिलांवर आतोनात अत्याचार सुरू झाले.

Afghanistan Crisis: Who are the Taliban? | Afghanistan Crisis: तालिबानी आहेत तरी कोण?

Afghanistan Crisis: तालिबानी आहेत तरी कोण?

Next

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर २० वर्षांनी तालिबानने पुन्हा ताबा मिळविला. हे तालिबानी म्हणजे नेमके कोण आणि त्यांचा इतिहास काय, हे अगदी थोडक्यात जाणून घेऊ या...

तालिबानची स्थापना कशी झाली? 
पश्तू भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो.  सोव्ह‍ियत रशियाचा पाडाव झाल्यानंतर रशियन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली. त्यानंतर उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाल्याचे बोलले जाते. तालिबान हा अफगाणिस्तानात नागरी युद्ध लढणारा एक लहान गट होता. त्याचे मूळ कंदहार शहरामध्ये होते. मुल्ला मोहम्मद ओमर याने तालिबानची स्थापना केली होती. तो कंदहारमध्ये एका मशिदीत इमाम होता. २०१३  मध्ये त्याला अमेरिकेने ठार मारले. तोपर्यंत त्याच्याकडेच नेतृत्व होते. 

कशावर विश्वास आहे? 
सत्तेत आल्यानंतर शरियतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षा पुरवू याची हमी त्या काळात तालिबानी देत होते. मात्र, त्या नावाखाली लुटमार आणि महिलांवर आतोनात अत्याचार सुरू झाले. १९९८ पर्यंत जवळपास ९० टक्के अफगाणिस्तान तालिबानच्या हातात गेला. 
तालिबानने पुरुषांना दाढी ठेवणे,  महिलांना बुरखासक्ती, टीव्ही, संगीत, सिनेमा, १० वर्षांवरील मुलींच्या शिक्षणाला बंदी, असे बरेच कायदे केले. महिलांवर बुरखा घालण्याची सक्ती केली. मध्य अफगाणिस्तानातील बमियान बुद्धाच्या प्राचीन मूर्ती पाडण्यात आल्याने त्याचा जगभरात निषेध झाला होता. 

तालिबान आणि अल-कायदाचा काय संबंध? 
तालिबानने अल-कायदा आणि ओसामा बिन लादेन यांना आश्रय दिला. अल-कायदाने अफगाणिस्तानात दहशतवादी तळ उभारले. तेथे तयार झालेल्या दहशतवाद्यांनी जगभरात दहशतवादी हल्ले केले.  

अमेरिकन कनेक्शन काय? 
अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक दशकांपासून शीतयुद्ध सुरू आहे. ९० च्या दशकात अमेरिकेने तालिबानला पाठिंबा दिला. सोव्हियत रशियाविरोधात अमेरिकेने हे छुपे पाऊल उचलले होते. मात्र, यात अमेरिकेचाच पुढे घात झाला आणि त्यातून अफगाणिस्तानात २० वर्षे अमेरिकेने  नागरी युद्ध लढले.

Web Title: Afghanistan Crisis: Who are the Taliban?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.