Afghanistan Crisis: अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू, धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:59 AM2021-08-20T07:59:33+5:302021-08-20T08:02:41+5:30

Afghanistan Crisis: अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Afghanistan Crisis) तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात अंधाधुंदी माजली आहे

Afghanistan Crisis:The famous Afghan young footballer zaki anwari  died after falling from a US plane | Afghanistan Crisis: अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू, धक्कादायक माहिती आली समोर 

Afghanistan Crisis: अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू, धक्कादायक माहिती आली समोर 

Next

काबूल - अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Afghanistan Crisis) तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात अंधाधुंदी माजली असून, अनेक जण देश सोडून पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, अफगाणिस्तानमधून जाणाऱ्या अमेरिकी विमानांना लटकून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात खाली पडणाऱ्या लोकांचे भयावह व्हिडीओ समोर आले होते. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Zaki Anwari) अमेरिकेच्या विमानामधून खाली पडून मरण पावलेला हा तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू असल्याचे उघड झाले आहे. ( The famous Afghan young footballer zaki anwari  died after falling from a US plane)

एरियाना न्यूज एजन्सीने यासंदर्भातील  वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर काबुल विमानतळावर अमेरिकेच्या सैनिकी विमानामधून खाली पडून मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानचा राष्ट्रीय संघातील फुटबॉलपटू झाकी अनवारी याचाही समावेश आहे. अनवारी हा काबुलमधील हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो अफगाणी नागरिकांपैकी एक होता. विमान उड्डाण करत असताना झाकी त्यावर चढला. मात्र अनवारी त्या विमानावरून खाली पडला. दरम्यान जनरल डायरेक्टरेटने या खेळाडूच्या मृत्यूच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

याबाबत अमेरिकेच्या हवाई दलाने सांगितले की, सोमवारी सी-१७ विमान काबुलच्या विमानतळावर उतरले तेव्हा शेकडो अफगाणी नागरिकांनी या विमानाला घेराव घातला. विमानतळावर चौफेर बिघडत असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेत वैमानिकांनी लवकर उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात विमानाने उड्डाण केल्यानंतर काही लोक खाली पडताना दिसत होते.  

Read in English

Web Title: Afghanistan Crisis:The famous Afghan young footballer zaki anwari  died after falling from a US plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.