Afghanistan: अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबान्यांकडून हवेत गोळीबार करत आनंद साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:08 AM2021-08-31T09:08:41+5:302021-08-31T09:09:56+5:30
Afghanistan: सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तालिबान्यांनी आनंद साजरा केला आहे.
१९ वर्षे, १० महिने आणि २५ दिवसांनंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले. दोन दशकांच्या लढाईनंतर अमेरिका येथून परतली असून, हा मोठा पराभव मानला जात आहे. सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तालिबान्यांनी आनंद साजरा केला आहे. (Afghanistan: Last US aircraft leaves Kabul, Taliban indulge in celebratory gunfire)
काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला. अमेरिकेने काबूल सोडल्यानंतर तालिबानने आता काबूल विमानतळ ताब्यात घेतले आहे. म्हणजे आता जर कोणाला देशाबाहेर जायचे असेल तर तालिबानच्या परवानगीनंतरच जाता येणार आहे. अफगाणिस्तानवर आता तालिबानचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहे.
Celebratory gunfire light up part of the night sky after the last US aircraft took off from the airport in Kabul early on August 31 pic.twitter.com/ofQfCPPYMZ
— AFP News Agency (@AFP) August 30, 2021
अफगाणिस्तानात २० वर्षांच्या युद्धानंतर विजयाचा आनंद साजरा करताना तालिबान्यांनी फटाके फोडत आकाशात गोळीबार केला. तालिबान्यांनी शेवटचे अमेरिकन विमान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीच्या आकाशात पाहिल्यानंतर त्यांच्या हवेत गोळीबार केला आणि फटाके उडवले.
अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केला आहे. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे, असे तालिबानने म्हटले आहे.
Now - Celebrating gunfire in Kabul pic.twitter.com/6LplqtHSIW
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 30, 2021
बायडेन यांनी आपल्या सैन्याचे आभार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भाष्य केले. जो बायडेन यांनी आपले सैन्य खतरनाक मोहिमेवरून परतण्यावर आभार मानले आहेत. ते म्हणाले की, गेल्या १७ दिवसांत आमच्या सैन्याने आजवरच्या अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट केले. आम्ही १.२ लाखांहून अधिक अमेरिकी नागरिक, सहकारी देशांचे नागरिक आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढले.