Taliban Afghanistan News: दाढी करण्यापासून ते पतंग उडवण्यापर्यंत, तालिबाननं अफगाणिस्तानात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींवर घातली बंदी? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:45 PM2021-09-29T18:45:04+5:302021-09-29T18:45:25+5:30

List of Activities That Taliban Govt Banned: अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तालिबाननं अमानवीय नियमांना लागू करण्यास सुरुवात केली आहे. ...

Afghanistan list of activities taliban government has banned in country IPL women sports kite flying | Taliban Afghanistan News: दाढी करण्यापासून ते पतंग उडवण्यापर्यंत, तालिबाननं अफगाणिस्तानात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींवर घातली बंदी? जाणून घ्या...

Taliban Afghanistan News: दाढी करण्यापासून ते पतंग उडवण्यापर्यंत, तालिबाननं अफगाणिस्तानात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींवर घातली बंदी? जाणून घ्या...

Next

List of Activities That Taliban Govt Banned: अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तालिबाननं अमानवीय नियमांना लागू करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या दक्षिण भागातील हेलमंद प्रांतात लोकांवर दाढी आणि केस कापण्यावर बंदी घालण्यात आली. शरिया आणि इस्लामिक नियमांअंतर्गत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. याशिवाय या नियमांचं जो उल्लंघन करेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर कब्जा प्राप्त केल्यानंतर आतापर्यंत तालिबाननं देशात अनेक गोष्टींमध्ये बदल केला आहे. 

तालिबाननं काबुलवर कब्जा केल्यानंतर माध्यम समूहांमध्ये महिला अँकरला काम करण्यास बंदी घातली. त्यानंतर तालिबाननं कंदहार प्रांतात संगीत आणि टेलिव्हिजन तसंच रेडिओ चॅनलवर महिलांच्या कामास बंदी घातली. तालिबाननं पत्रकार परिषद घेऊन महिलांना काम करू दिलं जाईल असं आधी आश्वासन दिलं होतं. पण प्रत्यक्षात महिलांना अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. सत्ता हातात येताच तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. देशातील मुलांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण मुलींच्या शिक्षणासाठी अद्याप कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

वाद्यांची तोडफोड
तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर देशातील कला क्षेत्राला मोठा धक्का बसला. तालिबाननं काबुलमधील राष्ट्रीय संगीत संस्थेत पियानो आणि ड्रम सेटसह अनेक वाद्यांची नासधुस केली. यासंदर्भातील अनेक फोटो देखील ट्विटरवर व्हायरल झाले होते. याशिवाय लग्नसोहळ्यासारख्या समारंभांमध्ये संगीतावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक कलाकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

आयपीएलच्या प्रसारणावर बंदी
संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणावर देखील अफगाणिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. इस्लामी विरोधी सामग्री असल्याचा ठपका ठेवत तालिबान्यांनी आयपीएलवर बंदी घातली आहे. याशिवाय देशातील महिलांना क्रिडा क्षेत्रात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यापुढे महिलांना कोणत्याही क्रिडा प्रकारात सहभाग घेता येणार नाही. 

पतंग उडवण्यावरही बंदी
पंतगबाजी अवैध असल्याचं म्हणत तालिबाननं देशात पतंग उडवण्यावरही बंदी घातली आहे. पतंगबाजीमुळे देशातील युवांना नमाज पठण आणि इतर धार्मिक विधी करण्यात व्यत्यय येतो, असं तालिबानचं म्हणणं आहे. अफगाणिस्तानातील तरुण पंतगबाजीला प्राधान्य देतात. त्यामुळे देशातील युवांचं लक्ष विचलीत होत असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. अफगाणिस्तानमध्ये पतंगबाजीचा एक मोठा व्यवसाय आहे. तालिबानच्या बंदीमुळे पंतग व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय आला आहे. 

Web Title: Afghanistan list of activities taliban government has banned in country IPL women sports kite flying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.