कॅशनं भरलेल्या चार कार्स आणि चॉपर घेऊन अशरफ गनींचं पलायन; रशियन दुतावासानं दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:50 PM2021-08-16T17:50:43+5:302021-08-16T17:52:07+5:30

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी यानंतर सोडला होता देश.

Afghanistan President Ashraf Ghani fled with cars and chopper full of cash says Russian embassy | कॅशनं भरलेल्या चार कार्स आणि चॉपर घेऊन अशरफ गनींचं पलायन; रशियन दुतावासानं दिली माहिती

कॅशनं भरलेल्या चार कार्स आणि चॉपर घेऊन अशरफ गनींचं पलायन; रशियन दुतावासानं दिली माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देअफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी यानंतर सोडला होता देश.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहे. दरम्यान, आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशरफ गनी हे पैशांनी भरलेल्या चार कार्स आणि चॉपर्स घेऊन पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अशरफ गनी यांनी पैशांनी भरलेल्या कार आणि चॉपर घेऊन पलायन केल्याचा दावा केला आहे. रशियाची वृत्तसंस्था RIA आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. अशरफ गनी यांना काही पैसे या ठिकाणीच सोडून जावे लागले कारण ते त्या ठेवू शकत नव्हते, असंही यावेळी सांगण्यात आलं. 

"चार कार्स या रोख रकमेनं भरलेल्या होत्या. त्यानंतर गनी यांनी काही रक्कम चॉपरमध्ये ठेवली. यानंतरही ते आपले पूर्ण पैसे त्यात ठेवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना काही पैस इकडेच ठेवून निघावं लागलं," अशी माहिती रशियाच्या दुतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंशचेन्को यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हे वक्तव्य करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

गनी यांनी लिहिली होती भावूक पोस्ट
"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं होतं. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं
"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले होतं.

Web Title: Afghanistan President Ashraf Ghani fled with cars and chopper full of cash says Russian embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.