“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:45 AM2021-08-16T08:45:22+5:302021-08-16T08:45:48+5:30

अशरफ घनी सध्या ओमान येथील अमेरिकन एअरबेसवर असून, लवकरच ते अमेरिकेत जातील, असे सांगितले जात आहे.

afghanistan president ashraf ghani wrote letter and statement on fleeing from country | “मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

Next

काबुल: आताच्या घडीला तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबाननेअफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आणि अखेर काबूलमध्ये प्रवेश केला. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला. अशरफ घनी सध्या ओमान येथील अमेरिकन एअरबेसवर असून, लवकरच ते अमेरिकेत जातील, असे सांगितले जात आहे. (afghanistan president ashraf ghani wrote letter and statement on fleeing from country)

तालिबानने रविवारी राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केले आहे. तालिबाने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर केले आहे. अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर एका भावूक पोस्ट लिहित घनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

गेली २० वर्ष जनतेचे प्राण वाचवले

माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबूलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते

मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असे घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, २००१ पासूनच तालिबान अमेरिका समर्थित सरकारशी संघर्ष करत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदयदेखील अमेरिकेच्या प्रभावामुळेच झाला होता. आता तोच तालिबान अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानमध्ये फौज उतरवली होती, तेव्हा अमेरिकेनेच त्या ठिकाणी असलेल्या मुजाहिद्दीनांना हत्यारे आणि प्रशिक्षण देत युद्धासाठी प्रवृत्त केले होते. परंतु त्यानंतरही ना सोव्हियत संघाने हार मानली आणि परत गेले, परंतु अफगाणिस्तानमध्ये एका कठ्ठरपंथी संघटनेचा जन्म झाला.
 

Read in English

Web Title: afghanistan president ashraf ghani wrote letter and statement on fleeing from country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.