पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 01:49 PM2021-09-11T13:49:36+5:302021-09-11T13:49:36+5:30

मानले जाते, की या दस्तऐवजांमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नुकतेच, पाकिस्तानने अफगानिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी आर्थिक योजनाही घोषित केली आहे.

Afghanistan secret data of taliban government in pakistan's hand there may be a big risk of security | पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

Next

इस्लामाबाद - अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानचा कब्जा व्हावा, असे पाकिस्तानला का वाटत होत, हे आता हळू हळू समोर येऊ लागले आहे. अफगाणिस्ताना प्रत्येक आघाडीवर तालिबानला मदत करणाऱ्या पाकिस्तानचे 'नापाक' इरादे आता पूर्ण होताना दिसत आहेत. आता, तालिबानच्या कब्जात असलेल्या अफगाणिस्तानातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. वृत्त आहे, की अफगाण सरकारचे अनेक गोपनीय दस्तऐवज आता पाकिस्तानच्या हाती लागले आहेत. (Afghanistan secret data of taliban government in pakistan's hand there may be a big risk of security)

डेटा लीक झाल्याने सुरक्षिततेला धोका - 
असे मानले जाते, की या दस्तऐवजांमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नुकतेच, पाकिस्तानने अफगानिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी आर्थिक योजनाही घोषित केली आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या वृत्तानुसार, मदत घेऊन काबूलला आलेली तीन सी -170 विमाने कागदपत्रांनी भरलेल्या बॅग घेऊन गेले आहे.

इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं 

तालिबाननेही नव्या अंतरिम सरकारच्या शपथविधीसाठीची 11 सप्टेंबर म्हणजेच अमेरिकेवरील दहशतवादी हल्याची तारीख टाळली आहे. याच तारखेला अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला 20वर्ष पूर्ण होत आहेत. तालिबानने 7 सप्टेंबरला आपल्या अंतरिम सरकारची घोषणा केली होती.

पाकिस्तानवर अवलंबून राहू शकते तालिबान सरकार -
सीएनएन-न्यूज18ने म्हटले आहे, की पाकिस्तानने आपल्या बरोबर नेलेले दस्तऐवज अत्यंत गोपनीय होते. हे पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) एजन्सीने आपल्या ताब्यात घेतले आहेत. इन दस्तऐवजांमध्ये प्रामुख्याने एनडीएसचे गोपनीय दस्तऐवज, हार्ड डिस्क्स आणि इतर काही डिजिटल माहिती आहे.  

Web Title: Afghanistan secret data of taliban government in pakistan's hand there may be a big risk of security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.