Afghanistan Taliban: २० वर्षीय यूट्युबर नजमाचा अखेरचा Video व्हायरल; “काश, हे एक वाईट स्वप्न असतं...”  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 04:02 PM2021-08-31T16:02:43+5:302021-08-31T16:06:23+5:30

नजमा काबुलच्या एका इन्स्टिट्यूटमधून जर्नलिज्मच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत होती.

Afghanistan Taliban: 20-year-old YouTuber Najma Sadeqi last video goes viral | Afghanistan Taliban: २० वर्षीय यूट्युबर नजमाचा अखेरचा Video व्हायरल; “काश, हे एक वाईट स्वप्न असतं...”  

Afghanistan Taliban: २० वर्षीय यूट्युबर नजमाचा अखेरचा Video व्हायरल; “काश, हे एक वाईट स्वप्न असतं...”  

Next
ठळक मुद्देकाबुल एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नजमाचा मृत्यू झाला होता. तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर नजमाच्या अखेरच्या व्हिडीओत ती निराश दिसली. नजमानं अलीकडेच अफगान इनसाइडर नावाचं यूट्यूब चॅनेल ज्वाईन केले होते. तिच्या व्हिडीओवर २ कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत

काबुल – अफगाणिस्तानच्या(Afghanistan) एक महिला यूट्यूबरनं मृत्यूपूर्वी तिचा शेवटचा व्हिडीओ बनवला होता. तो आता समोर आला आहे. काश हे एक वाईट स्वप्न असतं. काश आम्ही एक दिवस जगलो असतो. कारण आम्हाला कामावर जाण्याची आणि स्वत:च्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. त्यासाठी तुमच्यासाठी आमचा हा अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहोत असं २० वर्षीय नजमा सोदकी(Najma Sadeqi) हिने तिच्या अखेरच्या व्हिडीओत म्हटलं आहे.

काबुल एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नजमाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी नजमा जे काही व्हिडीओ अपलोड करत होती. त्यात ती मित्रांसोबत मज्जामस्ती करताना, भटकंती करताना, खाण्याचे व्हिडीओ पोस्ट करत होती. परंतु तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर नजमाच्या अखेरच्या व्हिडीओत ती निराश दिसली. तिने तिच्या शेवटच्या व्हिडीओत आता रस्त्यावर चालताना भीती वाटते. माझ्या चाहत्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन तिने व्हिडीओतून केले होते.

'मारना है या मर जाना है'! काबुल हल्ल्यातील शहीद जवानाची अखेरची पोस्ट व्हायरल

तसेच काबुलमध्ये आता जगणं कठीण झालं आहे. विशेषत: जे लोक आनंदी आणि स्वातंत्र्य आयुष्य जगत होते. नजमा काबुलच्या एका इन्स्टिट्यूटमधून जर्नलिज्मच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत होती. नजमानं अलीकडेच अफगान इनसाइडर नावाचं यूट्यूब चॅनेल ज्वाईन केले होते. तिच्या व्हिडीओवर २ कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत. अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा केल्यापासून व्लॉगर्स आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नजमाची मैत्रिण रोहिना अफशरने तिच्या निधनाची बातमी दिली.

"अजिबात झुकणार नाही", पंजशीरमधल्या वाघाची डरकाळी; तालिबानींना दिली थेट धमकी

रोहिनी अफशर म्हणाली की, मीदेखील असुरक्षित वातावरण जगतेय. अनेकजण माझा चेहरा ओळखतात. मला ऐकायला आलंय काहीजण माझ्यासारख्या मीडियात काम करणाऱ्या मुलींची ओळख पटवून त्यांना पकडण्याच्या तयारीत आहे. मला काबुलमध्ये अजिबात सुरक्षित असल्याची भावना निर्माण होत नाही. अफगाण इनसाइडरसोबत काम करणाऱ्या ख्वाजा समीउल्ला सिद्धीकी यांनी सांगितले की, मागील काही वर्षापासून अनेक युवक आणि युवती यूट्यूब चॅनेलसोबत काम करण्यास सुरुवात केली. इथं केवळ पैसे कमवण्याची संधी नव्हती तर स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द होती. परंतु काही आठवड्यापासून सर्वकाही बदललं. आम्ही नवीन व्हिडीओ आणणं बंद केले. आता आम्हाला भीती वाटते. सोमवारी अमेरिकन सैन्यानं काबुल एअरपोर्ट सोडलं. ज्यानंतर आता काबुल एअरपोर्टवरही तालिबानचा कब्जा झाला आहे. आता अफगाणिस्तान पूर्णत: तालिबानच्या कब्जात गेले आहे.   

Read in English

Web Title: Afghanistan Taliban: 20-year-old YouTuber Najma Sadeqi last video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.