Fact Check : "तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 09:39 AM2021-09-01T09:39:29+5:302021-09-01T09:55:03+5:30

Afghanistan Taliban Crisis And Fact Check : अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून तालिबान्यांची एका व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले. कंदहार परिसरात घिरट्या घालत असलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Afghanistan Taliban Crisis afghanistan helicopter hanging viral video truth taliban american helicopter | Fact Check : "तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

Fact Check : "तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

Next

तालिबान्यांनीअफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देश सोडण्यासाठी अमेरिकेला ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. परंतु एक दिवस आधीच अमेरिकेने येथून परतीची मोहीम पूर्ण केली आहे. अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने सोमवारी दुपारी काबूलहून उड्डाण केले. अमेरिकेची परतीची मोहीम पूर्ण झाल्यानंतर काबूल विमानतळाचा ताबा तालिबान्यांनी घेतला. रात्रभर तालिबान्यांनी विजयोत्सवच साजरा केला. मिठाईचे वाटप केले. काबूल विमानतळावर हवेत जोरदार फायरिंग केली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, इथे आमचे सैन्य गेली २० वर्षे होते. ही उपस्थिती आता संपली. गेल्या १७ दिवसांत आमच्या सैन्याने आजवरच्या अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट पार पाडले. 

अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून तालिबान्यांची एका व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले. कंदहार परिसरात घिरट्या घालत असलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह लटकल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर अमेरिकन सैन्याच्या (American Forces) वापसीनंतर विमानतळावर एक हेलिकॉप्टर उडत होतं. याला एक व्यक्ती लटकलेला होता. अमेरिकी सैन्याची मदत केल्याप्रकरणी या व्यक्तीला तालिबाननं शिक्षा दिली आहे आणि सैन्य वापसीनंतर तालिबानने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे असा दावा केला आहे. मात्र आता अफगाणिस्तानच्या पत्रकारांनी या व्हायरल व्हिडिओबाबतचं वेगळंच सत्य समोर आणलं आहे.

ज्या हेलिकॉप्टरला व्यक्ती लटकला होता ते अमेरिकी हेलिकॉप्टर हॉक होतं. सोशल मीडियावर तालिबानी शिक्षेचा दावा केला जात असतानाच स्थानिक पत्रकारांनी या व्हिडिओमागचं सत्य सांगितल्याने सर्वच जण हैराण झाले. जो व्यक्ती हेलिकॉप्टरला लटकला आहे, तो तब्बल 100 मीटर उंच झेंडा फडकवण्याचं काम करत होता. म्हणजेच त्याला कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती एक तालिबानीच आहे, जो झेंडा लावण्यासाठी लटकलेला होता. हेलिकॉप्टरच्या मदतीने तो हे काम करत होता. मात्र, यात तो यशस्वी झाला नाही.

'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

अमेरिकी पत्रकाराने पोस्ट केलेल्या व्हिडिओचं उत्तर देत अफगाण पत्रकार बिलालने ट्विट करत सांगितलं, की जो व्यक्ती हेलिकॉप्टर उडवत आहे, त्याला अमेरिका आणि यूएईमध्येच ट्रेनिंग दिलं गेलं आहे. व्हिडिओमध्ये एक तालिबानी व्यक्ती आहे, जो झेंडा फ़डकवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र यात अपयशी ठरला. व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसत आहे, की या व्यक्तीला दोरीच्या मदतीनं हेलिकॉप्टरला लटकवलं आहे. मात्र, व्हिडिओ झूम करून पाहिल्यास दिसतं, की या व्यक्तीला बांधलं गेलं आहे. जेणेकरून तो झेंडा लावू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Read in English

Web Title: Afghanistan Taliban Crisis afghanistan helicopter hanging viral video truth taliban american helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.