Afghanistan Taliban Crisis : "ते मला शोधून काढतील अन् मारून टाकतील"; देश सोडताना महिला पत्रकाराला कोसळलं रडू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 03:17 PM2021-08-26T15:17:09+5:302021-08-26T15:28:16+5:30

Afghanistan Taliban Crisis : अफगाणी महिला पत्रकार देश सोडताना विमानतळावर रडू लागली. "अफगाणिस्तानात राहिली तर मला मारून टाकलं जाईल. मी पुन्हा कधीच परतणार नाही" असं म्हटलं आहे.

Afghanistan Taliban Crisis female journalist leaving country said they know what i do they will kill me | Afghanistan Taliban Crisis : "ते मला शोधून काढतील अन् मारून टाकतील"; देश सोडताना महिला पत्रकाराला कोसळलं रडू

Afghanistan Taliban Crisis : "ते मला शोधून काढतील अन् मारून टाकतील"; देश सोडताना महिला पत्रकाराला कोसळलं रडू

Next

नवी दिल्ली - अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरू आहे. तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानमधील एका महिला पत्रकाराला देश सोडताना रडू कोसळलं आहे. 

अफगाणी महिला पत्रकार देश सोडताना विमानतळावर रडू लागली. "अफगाणिस्तानात राहिली तर मला मारून टाकलं जाईल. मी पुन्हा कधीच परतणार नाही" असं म्हटलं आहे. वहीदा फैजी असं अफगाणिस्तानमधील या स्थानिक महिला पत्रकाराचं नाव आहे. देशाबाहेर जाण्यासाठी काबूल विमानतळावर प्रवेश करण्याची वाट पाहत असताना या महिलेने बीबीसीशी संवाद साधला. “माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे मात्र मी इथं राहू शकत नाही. मला येथे मोकळा श्वास घेता येत नाही. तालिबान्यांना माहीत आहे की मी कोण आहे. त्यामुळे ते मला शोधून काढतील आणि मारून टाकतील. ते मला खरंच मारून टाकतील" असं वहीदा यांनी म्हटलं आहे. 

"माझं भविष्य या देशात राहिलेलं नाही. माझं माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे, पण मला जावं लागेल" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा तालिबानचा क्रूर चेहरा समोर आला आहे. गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन केलं म्हणून एका पत्रकाराला बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जिआर खान याद असं मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. जिआर हे काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. 

तालिबानचा क्रूर चेहरा उघड! गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन केलं म्हणून पत्रकाराला बेदम मारहाण

टोलो न्यूजच्या याआधी पत्रकाराची तालिबानने हत्या केल्याची बातमी कंपनीने दिली. मात्र थोड्याच वेळात या पत्रकाराने ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण जीवंत असल्याचं सांगितलं आहे. ट्विटर अकाऊंटवरून जिआर यांनी नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. "काबुलमध्ये रिपोर्टींग करताना तालिबान्यांनी मला बेदम मारहाण केली होती. कॅमेरा, तांत्रिक उपकरणे आणि माझा मोबाईल देखील हायजॅक करण्यात आला आहे. काही लोकांनी माझ्या मृत्यूची बातमी पसरवली मात्र ती खोटी आहे" असं जिआर खान याद यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title: Afghanistan Taliban Crisis female journalist leaving country said they know what i do they will kill me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.