Afghanistan Taliban Crisis : ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 03:59 PM2021-08-24T15:59:08+5:302021-08-24T16:06:41+5:30

Afghanistan Taliban Crisis : तालिबानने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या कार्यकारी गर्व्हनरच्या नावाची घोषणा केली आहे. 

Afghanistan Taliban Crisis haji mohammad idris afghanistan central bank acting governor taliban | Afghanistan Taliban Crisis : ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड

Afghanistan Taliban Crisis : ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड

googlenewsNext

अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. तालिबानने आता अफगाणिस्तानमध्ये आपले नवीन सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहेत. तालिबान नेत्यांकडून देशाच्या धोरणांबाबत निर्णय घेतले जात आहेत. याच दरम्यान तालिबानने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या कार्यकारी गर्व्हनरच्या नावाची घोषणा केली आहे. 

तालिबानने हाजी मोहम्मद इदरीस (Haji Mohammad Idris ) याला बँकेच्या गर्व्हरनरपदी नियुक्त केले आहे. हाजी मोहम्मद इदरीस याच्याकडे ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग तरीही तालिबानने त्याला अफगाण बँकेचं हेड केलं आहे. इदरीस हा तालिबानी नेता मुल्ला अख्तर मन्सूरच्या आर्थिक बाबी सांभाळत होता. मुल्ला अख्तर मन्सूर हा 2016 मध्ये झालेल्या एअरस्ट्राईकमध्ये मारला गेला होता. इदरीसने कोणतेही उच्च शिक्षण घेतलेले नाही. त्याशिवाय तो आर्थिक विषयातील जाणकार, तज्ज्ञदेखील नाही. मात्र, तो तालिबानचा आर्थिक व्यवहार मागील काही काळापासून सांभाळत आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

 

इदरीसकडे शैक्षणिक पदवी नसली तरी तो त्याच्या कामाच्याबाबत उत्तम असल्याचे तालिबानने सांगितले. अमेरिकेने सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेण्यास सुरुवात केली. तालिबान ही दहशतवादी संघटना असल्याचे अनेक देशांनी म्हटले. त्यामुळे अफगाणिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत देश चालवण्यासाठी तालिबानला अधिक आर्थिक मदतीची आवश्यकता भासणार आहे. अफगाणिस्तानचे आर्थिक संकट दूर करण्याची जबाबदारी हाजी मोहम्मद इदरीसला देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यापासून अफगाणिस्तानमधील आर्थिक व्यवहार, गती मंदावली आहे. देशांतर्गत आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी तालिबानकडून प्रयत्न सुरू आहेत. तालिबान सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच थकलेले वेतन देण्याची शक्यता आहे. जेणेकरून कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यास सुरुवात होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काबुल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. "अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे" असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. 

Web Title: Afghanistan Taliban Crisis haji mohammad idris afghanistan central bank acting governor taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.