Afghanistan Taliban Crisis:”मला अश्रू पुसावे लागतील, आमची कुणालाही पर्वा नाही”: धाय मोकळून रडतेय अफगाणिस्तानची मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:40 IST2021-08-16T15:37:25+5:302021-08-16T15:40:13+5:30
रविवारी अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा मिळवला आहे. प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे.

Afghanistan Taliban Crisis:”मला अश्रू पुसावे लागतील, आमची कुणालाही पर्वा नाही”: धाय मोकळून रडतेय अफगाणिस्तानची मुलगी
अफगाणिस्तानची अवस्था खूप बिकट होत चालली आहे. अफगाणची सत्ता तालिबानच्या हाती गेली आहे. त्यानंतर सगळीकडे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. लोकं आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळत आहेत. या पळापळीत आणि दहशतीच्या वातावरणात अफगाणिस्तानच्या एका मुलीने रडत रडत एक व्हिडीओ बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अफगाणिस्तानी मुलीनं देशाच्या होणाऱ्या अवस्थेकडे जगाने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले आहेत.
रविवारी अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा मिळवला आहे. प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे. यावेळी इंटरनेटवर अफगानी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती मुलगी धाय मोकळून रडत आहे. कदाचित तिनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नसतील. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत १६ लाखांहून अधिक जणांना हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ मानवाधिकार कार्यकर्ता मसीह अली नेजाद यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
४५ सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये रडत असलेली मुलगी म्हणते की, आमचं असणं कुणासाठीही फरक पडत नाही कारण आम्ही अफगाणिस्तानात जन्मलो. मला अश्रू पुसावे लागतील. कुणालाही आमची पर्वा नाही. इतिहासात आम्ही हळूहळू नष्ट होणार आहोत असं तिनं म्हटलं आहे. मिररच्या वेबसाईटनुसार, ज्या दिवशी व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी एका निवेदनात म्हटलंय की, अफगाणिस्तान नियंत्रणाच्या बाहेर गेले आहे. येथील संघर्षात महिला आणि लहान मुलांवर परिणाम होत आहे.
तालिबाननं काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर चीन झाला आनंदी #Talibans#Afganisthanhttps://t.co/LZszAVtqJl
— Lokmat (@MiLOKMAT) August 16, 2021
गुटेरेस पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या संकेतानुसार तालिबान त्यांच्या नियंत्रणात असलेल्या क्षेत्रात मानवाधिकारांवर गंभीर हल्ला करत आहे. विशेषत: महिला आणि पत्रकारांना टार्गेट केले जात आहे. अफगाणी मुलींनी आणि महिलांनी प्रचंड मेहनती जिंकलेले अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेतले जात आहे हे चित्र भयानक आणि ह्दयद्रावक आहे. अफगाणिस्तानात महिलांना अधिकार मिळावा यासाठी जागतिक प्रयत्न झाले. २००१ नंतर तालिबान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर महिलांना पुन्हा कामावर परतण्याची परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत तालिबानने अफगाणिस्तानमध्ये ३४ प्रांतीय राजधानीतील १८ वर कब्जा मिळवला आहे. देशात दोन तृतीयांश नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील महिलांच्या जगण्यावर पुन्हा दहशतीचं सावट आले आहे. तालिबान सत्तेत परतणं हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेद्वारा अफगाणिस्तान सरकार आणि त्यांच्या सुरक्षा दलांच्या निर्माणासाठी शेकडो अरबो डॉलर खर्च करण्यानंतर आलं आहे.
“We do not count because we were born in Afghanistan . . . We’ll die slowly in history.” I am heartbroken. The women & girls of Afghanistan have been abandoned. What of their dreams, hopes? The rights they have fought two decades for? #PrayforAfghanistanpic.twitter.com/Os6aSRv5RK
— Khaled Hosseini (@khaledhosseini) August 14, 2021
मागील २० वर्षापासून तालिबानचा अफगाणिस्तानशी संघर्ष
२००१ पासून तालिबान अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानशी लढाई करतोय. अफगाणिस्तानात तालिबानचा उदयही अमेरिकेच्या प्रभावामुळे झाला. आता तालिबान अमेरिकेसाठी मोठे डोकेदुखी बनला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानात फौज उतरवली होती. तेव्हा अमेरिकेने स्थानिक मुजाहिद्दीनला हत्यारं आणि ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन दिले होते. सोव्हियत संघाने हार पत्करली परंतु अफगाणिस्तानात एका कट्टर दहशतवादी संघटना तालिबानचा उदय झाला.
सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. तालिबानने २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये कधीकाळी सोव्हिएत संघाच्या फौजा होत्या. यांविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर यांने पुढे तालिबानची स्थापना केली.