Afghanistan Taliban Crisis : क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड! तालिबानींनी महिलेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:04 PM2021-09-14T15:04:24+5:302021-09-14T15:06:05+5:30

Afghanistan Taliban Crisis : तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Afghanistan Taliban Crisis mother murdered baby still in arms participating in women protest afghanistan | Afghanistan Taliban Crisis : क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड! तालिबानींनी महिलेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ

Afghanistan Taliban Crisis : क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड! तालिबानींनी महिलेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ

Next

नवी दिल्ली - तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली. अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. तालिबानींचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. 

तालिबानींनी एका महिलेवर गोळ्या झाडल्या असून तिच्या कुशीत तेव्हा 6 महिन्यांचं बाळ असल्याची माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानातील 30 वर्षांची फरवा तालिबानच्या जुलमी राजवटीला विरोध कऱण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. तालिबानविरोधी आंदोलनात सहभागी होत होती. आंदोलनामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र तरीदेखील ती तालिबानींना विरोध करत होती. त्यामुळेच तालिबानींनी तिचे निर्घृणपणे हत्या केली आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांची तालिबान हत्या करत आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांचा जीव घेत आहे. 

6 महिन्यांचं बाळ कडेवर असलेल्या महिलेवर झाडल्या गोळ्या 

फरवा नेहमीप्रमाणे आंदोलनासाठी बाहेर पडली. तिच्यासोबत तिचा अवघ्या 6 महिन्यांचा मुलगा होता. तर 3 वर्षांची मुलगी घरात होती. घरातून बाहेर पडताच तिच्यावर तालिबान्यांनी अमानूष पद्धतीने गोळीबार केला. या गोळीबारात फरवाचा मृत्यू झाला. त्याचवेळी तिच्या कडेवर तिचा चिमुकला होता. आईचा मृत्य़ू झाल्यानंतर ते बाळ कुशीत रडू लागलं आणि आई उठण्याची वाट पाहू लागलं. फरवाच्या पतीला ही घटना समजताच मोठा धक्का बसला आहे. त्याने घटनास्थळी धाव घेत आपल्या पत्नीच्या जवळ असलेलं 6 महिन्यांचं बाळ उचललं. 

आईला काय झालं, अशी फरवाची 3 वर्षांची मुलगी विचारत होती. त्यावर आई झोपली आहे, असं उत्तर फरवाच्या पतीने दिलं आहे. तर सहा महिन्यांच्या बाळालादेखील जखमा झाल्यामुळे त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. हे बाळ आणि त्याची 3 वर्षांची मुलगी आपली आई कधी परत येणार, याची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी तालिबान्यांनी घोर प्रांतात एका गर्भवती अफगाणी पोलीस महिलेला तिच्या कुटुंबासमोरच गोळ्या मारून ठार केल्याची भयंकर घटना समोर आली होती. 

तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या

निगारा असं या गर्भवती अफगाणी महिला पोलिसाचं नाव होतं. त्यांना पती आणि मुलांसमोर फिरोजकोह येथील तिच्या घरी मारण्यात आलं. अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. "महिला पोलीस अधिकारी निगारा यांना मुलं आणि पती यांच्यासमोर रात्री दहा वाजता घोर प्रांतात गोळ्या घालून ठार करण्यात आलं. निगारा या सहा महिन्यांच्या गरोदर होत्या" असं म्हटलं होतं. बिलाल सरवारी यांनी निगारा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हवाल्याने हे ट्विट केलं होतं.  मात्र, तालिबानने निगारा यांच्या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं होतं.

 

Web Title: Afghanistan Taliban Crisis mother murdered baby still in arms participating in women protest afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.