Afghanistan Taliban Crisis: तालिबानविरोधात लढणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी कैदेत; बल्ख प्रांतामधून घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 07:02 PM2021-08-18T19:02:22+5:302021-08-18T19:11:44+5:30

अफगाणिस्तान विरुद्ध तालिबान युद्धात शेवटचे तीन दिवस निर्णायक ठरले जेव्हा तालिबानने बाराच्या वर शहरं आपल्या ताब्यात घेतली.

Afghanistan Taliban Crisis: Taliban Captured Salima Mazari Who Took Up Arms To Fight In Balkh Afghanistan | Afghanistan Taliban Crisis: तालिबानविरोधात लढणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी कैदेत; बल्ख प्रांतामधून घेतलं ताब्यात

Afghanistan Taliban Crisis: तालिबानविरोधात लढणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी कैदेत; बल्ख प्रांतामधून घेतलं ताब्यात

Next

काबुल: तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबुलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवरतालिबानचा ताबा आहे. अफगाणी नागरिकांना तालिबानी शासनाचा आधीचा अनुभव असल्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमध्ये राहायचं नाही. त्यांना कुठल्याही परिस्थितीत देश सोडायचा आहे. यासाठी विमान हा एकमात्र पर्याय आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक विमानतळावर येऊन कोणत्याही फ्लाइटमध्ये चढून देशातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत. 

अफगाणिस्तान विरुद्ध तालिबान युद्धात शेवटचे तीन दिवस निर्णायक ठरले जेव्हा तालिबानने बाराच्या वर शहरं आपल्या ताब्यात घेतली. तालिबानचं सैन्य फक्त 60 हजारांचं आणि अफगाण सरकारकडे होते 3 लाखांहून जास्त सैनिक. तालिबानकडे होती लुटलेली, जुनी शस्त्रं. तर अफगाण फौजांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. पण असं असून फक्त 72 तासांमध्ये तालिबानने एकेक करत डझनभर शहरांवर ताबा मिळवत काबूल गाठलं. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

तालिबानविरोधात हातात शस्त्र घेणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी यांना ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सलीमा या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर आहेत ज्यांनी गेल्या काही काळापासून तालिबान्यांच्या विरोधात लढा दिला. तालिबान्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सलीमा माझरी यांनी स्वतःची सेना तयार केली होती. तालिबान्यांनी बल्ख प्रांतामधून सलीमा यांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी एक रणनीती आखून ते वाटचाल करत आहेत. तालिबानी संघटनेमध्ये आणि त्या संघटनेच्या बंडखोरांमध्ये मात्र बराच बदल झाल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. हा बदल तालिबानकडे मोठ्या प्रमाणावर आलेल्या संपत्तीमुळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका माहितीनुसार, अमेरिकेने सोव्हिएत संघाला शीतयुद्धात मात देण्यासाठीच तालिबानच्या स्थापनेला छुपा पाठिंबा दिला. एवढेच नव्हे, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि पैसा पाकिस्तानच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम अमेरिकेने केल्याचे सांगितले जाते.

Web Title: Afghanistan Taliban Crisis: Taliban Captured Salima Mazari Who Took Up Arms To Fight In Balkh Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.