BIG BREAKING Taliban Kidnapping Indians: काबुल विमानतळावर तालिबानकडून १५० भारतीय नागरिकांचं अपहरण?; तालिबाननं दावा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 01:00 PM2021-08-21T13:00:41+5:302021-08-21T13:01:29+5:30
Taliban Kidnapping Indians: काबुल विमानतळावर मायदेशात परतण्यासाठी वाट पाहत असलेल्या शेकडो भारतीय नागरिकांचं तालिबानकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती
Taliban Kidnapping Indians: अफगाणिस्तानाततालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर भारतासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काबुल विमानतळावर मायदेशात परतण्यासाठी वाट पाहत असलेल्या शेकडो भारतीय नागरिकांचं तालिबानकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अफागाणिस्तानच्या माध्यमांमध्ये याबाबतचं वृत्त प्रसारित केलं जात असल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. भारताकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर तालिबानी नेत्यांनीही या वृत्ताचं खंडन केलं असून भारतीय नागरिकांना सुखरूपरित्या काबुल विमानतळाच्या आत सोडल्याचा दावा केला आहे. Afghanistan Taliban have taken more than 150 people most of them Indians from Kabul airport
Multiple Afghan media outlets report kidnapping by Taliban of persons awaiting evacuation from #Kabul. Among them are reported to be Indian citizens. No official confirmation of this, more details awaited
— ANI (@ANI) August 21, 2021
अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्यासाठी अनेक भारतीय नागरिक काबुल विमानतळावर वाट पाहात आहेत. यात आज भारतीय वायूसेनेचं एक विमान काबुल विमानतळावरुन ८५ नागरिकांना घेऊन येण्यासाठी रवाना झालं आहे. पण त्याआधीच काबुल विमानतळावरुन भारतीय नागरिकांना तालिबान्यांनी बाहेर काढल्याचं वृत्त अफगाणिस्तानतील माध्यमांमध्ये असल्याचं एएनआयनं म्हटलं आहे. भारत सरकार याबाबतची माहिती अद्याप घेत असून अपहरण झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Ahmadullah Waseq, a Taliban spokesman has denied this report to a member of the Afghan media that reported on this story. More details are awaited. pic.twitter.com/hPq0i9evLK
— ANI (@ANI) August 21, 2021
दुसरीकडे तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्ला वसेकनं भारतीय नागरिकांचं वृत्त पूर्णपणे फेटाळून लावलं आहे. अहमदुल्ला वसेकनं तालिबानकडून एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. भारतीय नागरिकांचं काबुल विमानतळावरुन अपहरण झाल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार आहे. याउलट तालिबानकडून भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या विमानतळाच्या आत सोडण्यात आलं आहे, अशी माहिती अहमदुल्ला वसेकनं दिली आहे.