Afghanistan Taliban Crisis: अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:32 PM2021-08-16T15:32:08+5:302021-08-16T15:36:33+5:30
रविवारी तालिबाननं मिळवला होता अफगाणिस्तानवर कब्जा. अनेकांनी हा अमेरिकेचाही पराभव असल्याची दिली प्रतिक्रिया.
तालिबाननंअफगाणिस्तानवर रविवारी कब्जा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तसंच हत्यारं असलेले तालिबानी राष्ट्रध्यक्षांच्या भवनातही वावरत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, तालिबान आणि अफगाणिस्तानच्या चर्चेनं आता जोर पकडला आहे. काही लोकांनी हा अमेरिकेचा पराभव असल्याचंही म्हटलं आहे. याचदरम्यान, सोमवारी काही अफगाणी नागरिकांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. तसंच त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीला बायडेन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या सैन्याला माघारी बोलावणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तालिबाननंही पुन्हा सक्रिय होण्यास सुरूवात केली होती. अमेरिकन लष्कर जसं मागे परतू लागलं तसं अवघ्या काही कालावधीत तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केला. रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. तसंच आपल्याला रक्तपात टाळायचा असल्याची प्रतिक्रिया तालिबाननं दिली. तसंच हे युद्ध संपलं असून अफगाण लोकांना लवकरच हे सरकार कसं असेल हे समजणार असल्याचंही तालिबानच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं.
After 20 years, we are back in the 2000s. We want peace... If the Taliban takes over, there will be thousands of other Osama Bin Ladens, thousands of Mullah Omars... & they will unite with Pakistan, and go all over Central Asia: Hamdarf Gafoori, former Afghan journalist pic.twitter.com/QHE9oNHsc5
— ANI (@ANI) August 16, 2021
या संपूर्ण घटनेनंतर अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या अफगाणी लोकांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर जाऊन निदर्शने केली. तसंच सोमवारी व्हाईट हाऊस बाहेर जमलेल्या नागरिकांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली.
The Taliban are killing our people, women will not have any freedom there and there is no one to look after the people: Farzana Hafiz, one of the protesters broke down while narrating the ordeal of Aghanistan people after the country fell to the Taliban pic.twitter.com/ZLBcx0BDmf
— ANI (@ANI) August 16, 2021
"जवळपास २० वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकदा २००० मध्ये असलेल्या स्थितीवर आलो आहोत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शांतता हवी आहे. जर तालिबाननं सत्ता घेतली तर तर हजारो ओसामा बिन लादेन जन्माला येतील. तालिबानी लोक पाकिस्तानसोबत एकत्र येतील आणि मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण करतील," अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीनं दिली. तालिबानी लोकं महिलांवर निशाणा साधत आहेत. प्रत्येक जण त्यांच्या निशाण्यावर आहे, असंही एका व्यक्तीनं सांगितलं.