Afghnaistan Taliban: कंधार विमान अपहरण ते अमेरिकेवर हल्ला; जाणून घ्या तालिबानी दहशतीचा ‘टेरर कोड २३’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:09 PM2021-08-23T18:09:39+5:302021-08-23T18:13:14+5:30
१९९६ मध्ये पहिल्यांदा तालिबानची अफगाणिस्तानात सत्ता आली होती. दारुगोळा, शस्त्र, बॉम्बच्या जीवावर तालिबानींनी सत्ता काबिज केली.
काबुल – तालिबानने(Taliban) अफगाणिस्तानवर(Afghanistan) कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती खूप गंभीर बनली आहे. एअरपोर्टवर देश सोडण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली आहे. महिलांवर इतकी दहशत आहे की, सगळीकडे भयभीत वातावरण तयार झालं आहे. मोठ्या संख्येने अफगाणिस्तानातील अडकलेले भारतीय पुन्हा मायदेशी परतत आहेत. तालिबान जगासाठी किती धोकादायक आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या २३ वर्षाचा इतिहास माहिती असायला हवा.
तालिबानची पहिली सत्ता
१९९६ मध्ये पहिल्यांदा तालिबानची अफगाणिस्तानात सत्ता आली होती. दारुगोळा, शस्त्र, बॉम्बच्या जीवावर तालिबानींनी सत्ता काबिज केली. संपूर्ण अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू करण्यात आला होता. महिलांची आयुष्य बिकट झालं होतं. लहान मुलांच्या हाती बंदुक सोपवण्यात आली होती. त्यावेळी तालिबानने जगभरातील दहशतवाद्यांना शरण दिले होते. जगभरातील दहशतवाद्यांसाठी तालिबान घर बनलं होतं. ओसामा आणि त्याच्या अलकायदाला तालिबानींनी शरण दिली होती.
कंधार प्लेन हायजॅक
१९९९ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. तेव्हा डिसेंबरमध्ये भारतीय विमान IC 814 चं अपहरण करण्यात आलं होतं. हे विमान अफगाणिस्तानला नेण्यात आले. कारण अफगाणिस्तान सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचं दहशतवाद्यांना माहिती होते. भारत सरकार अफगाणिस्तानात अपहरणकर्त्यांवर कारवाई करू इच्छित होती. ज्यांनी अपहरण केलेल्या लोकांची सुटका होईल. परंतु तालिबानने स्पष्टपणे कारवाई करु नये असं बजावलं होतं. अपहरणकर्त्यांना तालिबाननं हत्यारंही पुरवलं होती.
अमरिकेत ९/११ दहशतवादी हल्ला
तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेतून बाहेर झाली आणि अमेरिकेन सैन्य अफगाणिस्तानला पोहचलं. २००१ मध्ये ९ सप्टेंबर रोजी अमेरिका Twin Tower वर हायजॅक प्लेनने हल्ला केला. यात जवळपास ३ हजार लोकं मारली गेली. तर २५ जण जखमी झाले होते. ओसामा बिन लादेनची संघटना अलकायदा आणि सहकारी मोहम्मद अता यांनी या हल्ल्याचा कट रचला. त्यानंतर अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात तालिबानवर हल्ले सुरु केले.
पाकिस्तान आणि ओसामा यांची मैत्री
२०११ मध्ये सकाळी सकाळी बातमी आली ओसामा बिन लादेन मारला गेला. परंतु तो अफगाणिस्तानात नव्हे तर पाकिस्तानात मारला. तेव्हा पाकिस्तान दहशतवादी कनेक्शन आणि तालिबानविरोधात सर्वात मोठा पुरावा सापडला. ओसामा पाकिस्तानात लपला होता. पाकिस्तानही दहशतवाद्यांना संरक्षण देते हे जगासमोर उघड झालं.
अफगाणिस्तानात तालिबान रिटर्न
आता २० वर्षांनी तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानात कब्जा केला आहे. लोकं देश सोडून पळून जात आहेत. अनेक ह्दयद्रावक फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान दहशतवाद्यांचा अड्डा बनेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे पुन्हा दहशतवाद्यांनी सक्रीयता केली तर भारतासाठी चिंतेचा विषय बनू शकतं.